खेर्डी परिसरात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मेलेल्या माशांचा खच जमा झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्यावर तरंगणारे शेकडो मासे मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे पर्यावरणीय धोका निर्माण झाला असून नागरिकांनी तात्काळ प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.