हरयाणा एडीजीपी वाय.एस. पुरण यांनी सरकारी निवासस्थानी सर्व्हिस गनमधून गोळी झाडून आत्महत्या केली. (फोटो - सोशल मीडिया)
ADGP Y. S. Puran suicide : हरयाणा : हरयाणामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजचता दिवस पोलीस विभागासाठी खूप दुःखद दिवस ठरला. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सध्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) वाय.एस. पुरण यांनी चंदीगड येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हरयाणाचे एडीजीपी वाय.एस. पुरण यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानाचा परिसर सील केला असून तपास सुरू केला. पुरण यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण पोलिस विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
घटनास्थळी उडाला एकच गोंधळ
घटनेची माहिती मिळताच, चंदीगड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी एडीजीपी पूरण यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल. त्याचबरोबर योग्य ती कार्यवाही करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे आणि तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाय एस पुरण यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. घटनेच्या सभोवतालची परिस्थिती निश्चित करण्यासाठी पोलिस आता घर आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय विभागामध्ये बसला धक्का
आयपीएस वाय.एस. पुरण हे २००१ च्या बॅचचे हरियाणा केडरचे अधिकारी होते. ते एक प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खूप धक्का बसला आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना एक समर्पित आणि जनहितचिंतक अधिकारी म्हणून ओळखले जाते. मात्र त्यांनी अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला याचे कारण समोर आलेले नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पत्नी जपानच्या अधिकृत दौऱ्यावर
मीडिया रिपोर्टनुसार, एडीजीपी पुरण यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी, घटनेच्या वेळी मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यासोबत अधिकृत दौऱ्यावर जपानमध्ये होत्या. त्यांना ही बातमी मिळताच घटनेची माहिती देण्यात आली. सध्या, पोलीस आत्महत्येमागील कारणांचा तपास करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की आत्महत्येमागील कारणाचा कोणताही पुरावा देणारी कोणतीही चिठ्ठी किंवा कागदपत्रे सापडलेली नाहीत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे. एडीजीपी पूरन यांच्या निधनाने संपूर्ण हरियाणा पोलिस विभागाला धक्का बसला आहे. वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे वर्णन एक कर्तव्यदक्ष आणि समर्पित अधिकारी असे केले. राज्य सरकारने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत.