थेंब-थेंब पाण्यासाठी तडफडणार पाकिस्तान (फोटो -istockphoto)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने अनेक मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. त्यात सिंधु जल करार स्थगित करणे हा मोठा निर्णय होता. भारताने पहलगामकहा बदल घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार मारले. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये सीजफायर झाले. मात्र तरीही पाकिस्तान आता थेंबथेंब पाण्यासाठी तडफडणार आहे. कारण भारताने सिंधु जल करार अजूनही स्थगितच ठेवला आहे.
भारताने चिनाब नदीवरील बगलिहार डॅममधून पाकिस्तानला जाणारे पाणी पूर्णपणे बंद केले आहे. पाणी बंद केळ्यावरील परिस्थिती काय आहेत त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. या धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 8 मे रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर बगलिहार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
पहालगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र त्या आधी भर्तणे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सिंधु जल करार स्थगित केला आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे.
युद्धबंदी झालयावर देखील भारताने सिंधु जल करार स्थगित ठेवला आहे. पाकिस्तानकडे जाणारे पाणी भारताने रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाण्याची अडचण निर्माण होणार आहे.
सिंधू जल करार आहे तरी काय?
सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तानमधील एक ऐतिहासिक जल करार आहे, जो 1960 मध्ये स्वाक्षरी करण्यात आला होता. त्यावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष फील्ड मार्शल अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती आणि जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. या कराराचा उद्देश सिंधू नदी प्रणालीच्या पाण्याच्या वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तानमधील कोणताही वाद शांततेने सोडवणे हा होता. भारताने सिंधू जल करारावर स्थगिती आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सिंधू जल करार आहे तरी काय? भारताने बंदी घातली तर पाकिस्तानावर काय होईल परिणाम?
पाकिस्तानच्या सुमारे 80 टक्के कृषी सिंचन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंधू पाणी करारावर भारताने बंदी घातल्याने पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट निर्माण होईल आणि त्याचा शेतीवर परिणाम होईल. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये सिंधू नदीशी संबंधित अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत. अशा परिस्थितीत, पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम होईल आणि ऊर्जा संकट अधिक तीव्र होईल, जे पाकिस्तानमध्ये आधीच एक मोठी समस्या आहे.
पंजाबसह सिंध प्रदेशातील लोक पाण्यावर अवलंबून
पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रदेशातील लाखो लोक पिण्याच्या पाण्यासाठी या नदी प्रणालीवर अवलंबून आहेत. आत्तापर्यंत पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्याचे हक्क मिळाले. भारताला रावी, बियास आणि सतलजच्या पाण्याचे हक्क मिळाले आहे. तर भारताला पश्चिमेकडील नद्यांवर मर्यादित वापराची परवानगी आहे,