File Photo : Sharad Pawar
कोहिमा : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांना नागालँडमध्ये मोठा धक्का बसला आहे. नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शारिंगन लोंगकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका फेटाळून लावली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत टकले यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी 7 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.
या आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने समर्थनाची पत्रे दिली होती. टकले यांनी सात आमदारांचा पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावाही केला होता. आयोगाने सात आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम निर्णय घेण्याची विनंती अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 30 ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्षांना केली होती.
नागालँडचे अध्यक्ष वांथुगो ओड्यू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला 6 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशाची माहिती दिली.
सात आमदारांना मिळाला दिलासा
विधानसभा अध्यक्षांनी पिक्टो शोहे, पी लाँगॉन, नम्री नचांग, वाय म्होनबेमो हमत्सो, एस. तोइहो येप्थो, वाई. मानखाओ कोन्याक आणि ए पोंगशी फोम यांना दिलासा दिला.






