देहरादून : ‘द केरला स्टोरी’ (The Keral Story) या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सध्या सुरू आहे. या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यातच उत्तराखंडमधील एका भाजप नेते यशपाल बेनाम (Yashpal Benam) यांनी मुलीचे लग्न मुस्लिम तरुणासोबत ठरवले होते. मात्र, हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या जोरदार टीका, विरोधानंतर अखेर बेनाम यांनी हे लग्न मोडल्याची माहिती समोर आली आहे.
यशपाल बेनाम हे पौडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत. 28 मे रोजी त्यांच्या मुलीचे लग्न एका मुस्लिम तरूणासोबत होणार होते. या लग्नाची पत्रिकाही काढण्यात आली होती आणि हीच पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर यावर टीका होऊ लागली होती. अखेर हे होणारे लग्न मोडण्यात आले. या लग्नाला हिंदू संघटनांनी प्रचंड विरोध केला होता. तसेच याच दबावाखाली येऊन त्यांनी हा विवाह सोहळा रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
आता जनतेची भावना समजून घेणार
मी आपल्या मुलीच्या आनंदासाठी तिचे मुस्लिम व्यक्तीशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र या लग्नाबाबत सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मी लग्न पुढे ढकलले. आता मला लोकांचेच ऐकणार आहे. लोकांना मला जोरदार निशाणा करत माझ्यावर टीका केली.