अलाहाबाद हायकोर्टाचा हिंदू पक्षाला धक्का (फोटो- ani)
मथुरा: श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण आणि शाही ईदगाहच्या वादग्रस्त जमिनीचा वाद सध्या अलाहाबाद हायकोर्टात आहे. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळून लावत मशिदीस वादग्रस्त रचना म्हणण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिंदू पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने सध्या समोर असलेल्या तथ्यानुसार, शाही इदगाहला वादग्रस्त रचना म्हंटले जाऊ शकत नाही. 5 मार्च 2025 मध्ये हिंदू पक्षाचे प्रतिनिधी महेंद्र प्रताप सिंह यांनी हायकोर्टात ईदगाह मशिदीच्या वास्तूला वादग्रस्त वास्तू घोषित करण्याची मागणी केली होती. श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर एक प्राचीन मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद उभारली गेली असा हिंदू पक्षाचा दावा आहे.
Krishna Janmabhoomi-Shahi Eidgah dispute | Allahabad High Court dismisses a plea that sought to declare Shahi Eidgah Mosque as a "disputed structure".
— ANI (@ANI) July 4, 2025
अलाहाबाद हायकोर्टात या याचिकेवर 23 मे रोजी सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान आज हायकोर्टाने हिंदू पक्षकी ही मागणी फेटाळून लावली आहे.
काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी वाद?
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद अनेक दशके जुना आहे. मथुराचा हा वाद एकूण 13.37 एकर जमिनीच्या मालकीशी संबंधित आहे. 12 ऑक्टोबर 1968 रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. या करारात 13.7 एकर जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, श्रीकृष्ण जन्मस्थानकडे 10.9 एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. हिंदू बाजूने शाही इदगाह मशिदीचे वर्णन बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली रचना आहे आणि या जमिनीवर दावाही केला आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंकडून होत आहे. मथुरा दिवाणी न्यायालयात 13.37 एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका मथुरा न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
इतिहास काय सांगतो?
असा दावा केला जातो की औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी 1669-70 मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर 1770 मध्ये गोवर्धन येथे मुघल आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. 1935 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनारसचे राजा कृष्ण दास यांना 13.37 एकर जमीन दिली. 1951 मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने ही जमीन संपादित केली.