राहुल गांधी यांची अडचणीत वाढ होण्याची शक्यता (फोटो -सोशल मिडिया)
लखनौ: कॉँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अलाहाबाद हायकोर्टाने राहुल गांधी यांना मोठा दणका दिला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्टाने राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. या समन्सविरुद्ध राहुल गांधी आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती. मात्र अलाहाबाद हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
अलाहाबाद हायकोर्टाने राहुल गांधी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खालील कोर्टात निर्णयाविरुद्ध निरीक्षण याचिका दाखल करावी लागणार आहे. राहुल गांधी यांनी हायकोर्टात सेशन कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सादर केली होती. मात्र हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. खालच्या कोर्टात आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे यावेळी हायकोर्टाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
2022 मध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी आपमानास्पद वक्तव्य केले होते. त्या वकतव्याविरुद्ध राहुल गांधी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी या प्रकरणात कोर्टात हजर राहण्यापासून सूट मिळावी म्हणून अर्ज केला तेव्हा कोर्टाने त्यांना २०० रुपये दंड ठोठावला होता. 17 नोव्हेंबर 2022 मध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी वीर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद टिपण्णी केली होती. या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
काय असणार राहुल गांधी यांच्यासमोर पर्याय?
अलाहाबाद हायकोर्टाने राहुल गांधी यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात दिलासा मिळवण्यासाठी राहुल गांधी यांना सेशन कोर्टात दाद मागावी लागणार आहे. या ठिकाणी देखील त्यानहकी याचिका फेटाळून लावली गेली तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामीचे प्रकरण; कोर्टाने राहुल गांधींबाबत दिला ‘हा’ निकाल
पुण्यात देखील तक्रार दाखल
लंडनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर खटला दाखल करण्यातला कोर्टात धाव घेतली होती. लंडन येथे भारतीय लोकांसमोर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. याबाबतचा अहवाल पोलिसांनी पुणे कोर्टात दाखल केला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे कोर्टात राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते.