राहुल गांधीना जीवे मारण्याची धमकी (फोटो- सोशल मीडिया)
राहुल गांधींसह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी
कॉँग्रेसचा भाजप-आरएसएसवर गंभीर आरोप
पवन खेडा यांनी शेयर केला एक्सवर व्हिडिओ
नवी दिल्ली: विरोधी पक्षाचे नेते आणि कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. राहुल गांधी यांच्यासह २५ अन्य कॉँग्रेस खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कॉँग्रेस नेत्याने याबाबत एक व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे समोर आले असून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पवन खेडा यांचे ट्वीट काय?
संपूर्ण भाजप आणि आरएसएस ही गोडसे फॅक्टरी आहे. तथाकथित करणी सेनेने राहुल गांधी यांच्यासह २५ खासदारांना दिलेल्या धमक्या या वेगळ्या घटना नाहीत. या एका सुनियोजित कटाच्या भाग आहे.
सर्वथ पहिल्यांदा किरेन रिजिजू यांनी सभागृहात कॉँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओं बिर्ला यांचा अपमान केल्याचा खोटा दावा केला. उपलब्ध व्हिडिओमध्ये अपमान झाल्याचे दिसून येत नाही. तर यामध्ये सभापति हसताना दिसून येत आहेत.
पूरा RSS-भाजपा तंत्र एक “गोडसे फैक्ट्री” है। तथाकथित करणी सेना द्वारा राहुल गांधी और “25 सांसदों” के खिलाफ दी गई धमकी कोई अलग-थलग पड़ी घटना नहीं है। यह एक सुनियोजित और कपटपूर्ण साज़िश का हिस्सा है। ▪️पहले, @KirenRijiju ने सार्वजनिक रूप से झूठ बोला और देश को गुमराह किया कि… pic.twitter.com/jB8HjM9MdP — Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) February 19, 2026
राहुल गांधी हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे भाजप खासदारांनी विविध व्यासपीठावर सांगण्यास सुरुवात केली. विरोधकांना खास करून राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी आखण्यात आलेली ही एक सुनियोजित मोहीम आहे. तेव्हा देखील एक गोडसे तयार केला होता आणि आता देखील एक गोडसे तयार केला जात आहे.
धमकी नक्की काय होती?
ज्या प्रकारे संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा अपमान केला. त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हे केले गेले असल्याचे या व्हीडिओत सांगण्यात आले आहे. पुन्हा असे घडले तर आम्ही घरात घुसून गोळ्या मारू आणि याला प्रशासन जबाबदार असेल, हे राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे. २४ तासांत त्या खासदारांना अटक झाली तर ठीक. नाहीतर प्रत्येकाला घरात घुसून आम्ही गोळ्या मारू, असे या व्हीडिओतून धमकी देण्यात आली आहे. ही धमकी करणी सेनेच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.






