मिर्झापूर : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. यातील आरोपीने विवाहित महिलेवर 25 दिवस बलात्कार (Rape on Woman) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पीडितेला जबरदस्तीने बुरखाही घालण्यास भाग पाडले होते. इतकेच नाहीतर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओच त्याने बनवल्याची बाबही उघडकीस आली आहे.
मिर्झापूर जिल्ह्यात आरोपी आरिफने एका विवाहित महिलेला अभय असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिला घेऊन तो अंबाला येथे गेला. अंबाला येथे गेल्यावर या विवाहितेला त्याचे खरे रूप कळाले. त्यावेळी तो अभय नसून आरिफ असल्याचे समजले. आरिफने विवाहितेचे 25 दिवस लैंगिक शोषण केले. तेथे त्याने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटोही काढल्याची घटना घडली.
गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल
विवाहितेलाही बुरखा घालण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. नवऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर विवाहित महिला घरी परतली. त्यानंतर घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी हा पूर्णपणे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगून गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
राँग नंबरने झाली सुरुवात अन्…
एप्रिल महिन्यात आरिफने पहिल्यांदा अभय असल्याचे भासवले. त्यानंतर एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. विवाहितेला अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्यानंतरच काही दिवस फोनवर बोलून मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
बहिणीचीही साथ
अंबाला येथे गेल्यानंतर विवाहितेला हा अभय नसून आरिफ असल्याचे समजले. आरिफने विवाहितेवर 25 दिवस बलात्कार केला. आरिफला यासाठी त्याच्या बहिणीची साथ होती, अशी माहितीही समोर आली आहे.