अयोध्येतील राम मंदिराला केवळ 11 दिवसांत मिळाले कोट्यवधी रुपयांचे दान; आकडा जाणून व्हाल धक्क

  अयोध्या : राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा अगदी थाटामाटामध्ये अयोध्येमध्ये (Ayodhya) पार पडला. या अभूतपूर्व सोहळयासाठी राम भक्त आतुर झाले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर लाखो भाविकांची गर्दी राम मंदिरामध्ये दर्शनासाठी झाली होती. पोलिसांना ही गर्दी आवरणे देखील कठीण होऊन बसले होते. मात्र केवळ 11 दिवसांमध्ये अयोध्येच्या राम मंदिरामध्ये कोट्यवधी रुपयांची देणगी (Ram Mandir Donation) आलेली आहे. या देणगीचा आकडा सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

  22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडला. यानंतर कालचा दिवस वगळता मागील 11 दिवसांमध्ये भक्तप्रिय रामलल्लाच्या चरणी कोट्यवधी रुपयांची देणगी आलेली आहे. गेल्या 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी रामललाच्या दरबारात दर्शन घेतले आहे. 11 दिवसांत सुमारे 8 कोटी रुपये दानपेटीत जमा झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 3 कोटी 50 लाख रुपये चेक आणि ऑनलाइन स्वरूपात मिळाले आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर पहिल्याच दिवशी 3 कोटी 17 लाख रुपयांची देणगी आली होती. रामभक्तांनी आपल्या प्रिय रामांच्या चरणी केलेले हे दान पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच यामुळे उत्तर प्रदेशच्या महसूलमध्ये देखील मोठा बदल झालेला दिसणार आहे.

  देणगीवर सीसीटीव्हीची करडी नजर

  राम मंदिरातील वाढती भक्तांची संख्या लक्षात घेत अयोध्यामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मिळालेल्या सर्व देणगीची रितसर मोजणी देखील केली जात आहे. रामललाच्या दारात ठेवलेल्या चार दानपेटीत इतकी रोकड येत आहे की, पैसे मोजण्यासाठी 14 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 11 बँक कर्मचारी आणि तीन मंदिर ट्रस्टशी संबंधित आहेत. ही टीम दररोज दान केलेल्या पैशांची मोजणी करते. पैसे जमा करण्यापासून ते मोजणीपर्यंतची प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली केली जाते.

  कोट्यवधी रुपये व किलोभर सोने येत आहे देणगी

  मुकेश अंबानी यांनी 2 कोटी रुपयांहून अधिक रक्कम दान केली होती. त्याचवेळी हिरे व्यापारी दिलीप कुमार लाखी यांनी 101 किलो सोने दान केले होते. पाटण्याच्या महावीर मंदिराने 10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. महावीर मंदिराने रामललासाठी सोन्याचे धनुष्य आणि बाणही दान केले आहेत. राम मंदिराचे दरवाजे, त्रिशूळ आणि डमरू हे सोन्यापासून बनवण्यात आले आहेत.