बांग्लादेशचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय (फोटो- सोशल मीडिया)
बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार वनडे सिरिज
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव
बांगलादेशच्या गोलंदाजांनी केली भेदक गोलंदाजी
Austrelia Vs Bangladesh 1st ODI Live: सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची सिरिज खेळवली जात आहे. ही सिरीज बांगलादेशमध्ये खेळवले जात आहे. आज या सिरिजमधील पाहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाचा 86 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे 3 सामन्यांचा मालिकेत बांग्लादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
बांगलादेश दौऱ्यावर आलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आजचा सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने अप्रतिम सांघिक कामगिरीच्या जोरावर डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा 86 रन्सने पराभव केला आहे. बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला तब्बल २१ वर्षांनंतर पराभूत करण्याचा महापराक्रम केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगलादेशच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. लिटन दास, सैफ हसन लवकर आउट झाला. मोसद्देक हुसेनने बांग्लादेशसाठी 86 रन्सची महत्वाची खेळी केली. तंझिद हसनने 54 रन्स करत त्याला साथ दिली. या खेळीच्या जोरावर बंगलादेशने ऑस्ट्रेलियाला 285 रन्सचे टार्गेट दिले.
ऑस्ट्रेलियाचा संघ 285 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र बांग्लादेशसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. बांगलादेशचा नवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा कर्दनकाळ ठरला. त्याने 10 ओव्हर्समध्ये 4 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीन आणि ॲलेक्स कॅरीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाची स्थिती 9 विकेट 191 रन्स अशी झाली होती. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमाचा आधार घेण्यात आला आणि बांगलादेशला 86 रन्सने विजयी घोषित करण्यात आले.
बातमी अपडेट होत आहे…






