'शरबत जिहाद' वरून हायकोर्टाने फटकारले (फोटो सौजन्य - X)
Delhi High Court On Baba Ramdev in Marathi: योगगुरू बाबा रामदेव यांनी हमदर्द रूह अफजावर केलेल्या टिप्पणीवरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना कडक शब्दांत फटकारले आहे. याप्रकरणी न्यायालयाने म्हटले की, बाबा रामदेव कोणाच्याही नियंत्रणात नाहीत. ते स्वत: च्या जगात राहतात, असं म्हणतं हायकोर्टाने बाबा रामदेव बाबा यांना फटकारले आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सांगितले की, बाबा रामदेव यांच्या रूह अफजाची सुनावणी न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी हमदर्द नॅशनल फाउंडेशन इंडियाने रामदेव यांच्या पतंजली फूड्स लिमिटेडविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर केली होती. “यामुळे न्यायालयाच्या विवेकाला धक्का बसला आहे. हे समर्थनीय नाही. न्यायालयाने रामदेव यांच्या वकिलाला रामदेव यांच्याकडून सूचना घेण्यास सांगितले होते अन्यथा कठोर आदेश देण्यात येईल.”
३ एप्रिल रोजी बाबा रामदेव यांनी रुह अफजा बनवणाऱ्या हमदर्द कंपनीवर भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, औषध आणि अन्न उत्पादन कंपनी मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी त्यांचे पैसे वापरत आहे. यानंतर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, पतंजली शरबतचा प्रचार करताना, यामध्ये ते म्हणतात की, ऐकू येतो की शरबतच्या नावाने एक कंपनी आहे जी शरबत देते पण शरबतपासून मिळणाऱ्या पैशातून ती मदरसे आणि मशिदी बांधते.
रामदेव म्हणाले होते, ‘जर तुम्ही ते शरबत प्याल तर मशिदी आणि मदरसे बांधले जातील आणि जर तुम्ही पतंजलीचे शरबत प्याल तर गुरुकुल बांधले जातील, आचार्यकुलम बांधले जातील, पतंजली विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण मंडळ प्रगती करेल.’ म्हणूनच मी म्हणतो की हे ‘शरबत जिहाद’ आहे. ज्याप्रमाणे ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ चालू आहेत, त्याचप्रमाणे ‘शरबत जिहाद’ देखील चालू आहे.