नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना जवळपास संपत आला आहे आणि आता 2023 चा तिसरा महिना मार्च 2023 (March 2023) सुरू होणार आहे. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या दृष्टीनेही हा महिना खूप महत्त्वाचा आहे. मार्च महिनाही बँकांच्या सुट्ट्यांनी भरलेला असतो. मार्च 2023 मध्ये बँक सुट्ट्या या महिन्यात बरेच दिवस बंद राहणार आहेत. [blurb content=””](RBI) ने मार्च महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची (Bank Holidays In March 2023) यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मार्चमध्ये विविध राज्यांमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. तुम्ही ही यादी एकदा तपासून पहा म्हणजे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
[read_also content=”ड्रॅगनच्या ओझ्याखाली दबलं शाहबाज सरकार; कंगाल पाकिस्तानला चीनचा आधार, ७० कोटी डॉलर दिलं कर्ज https://www.navarashtra.com/world/china-gave-70-crore-dollor-loan-to-pakistan-amid-economic-crisis-nrps-372153.html”]
3 मार्च 2023 – चपचार कूट, मिझोरमधील सण (ऐझॉलमध्ये बँका बंद राहतील)
5 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)
7 मार्च 2023 – धुलीवंदन होळी, डोल जत्रा, याओसंग (मुंबई, नागपूर, बेलापूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, रांची कानपूर, पणजी आणि लखनौ येथे बँका बंद राहतील)
8 मार्च 2023 – होळी (देशातील बहुतांश भागात बँका बंद राहतील)
11 मार्च 2023 – दुसरा रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)
12 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)
19 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)
22 मार्च 2023 – गुढी पाडवा / पहिले नवरात्र / तेलुगु नववर्ष दिवस (बेलापूर, मुंबई नागपूर, पणजी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील)
25 मार्च 2023 – चौथा शनिवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)
26 मार्च 2023 – रविवार (देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल)
30 मार्च 2023 – राम नवमी (देशातील बहुतांश बँकांना सुट्टी असेल)
आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळीसह अनेक सणांमुळे स्थानिक बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेच्या सुट्ट्यांची यादी लक्षात घेऊन बँकेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या काम करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.