Opreation Sindoor चे पडद्यामागील हिरो; हवाई दलाने शेअर केला फोटो
Opreation Sindoor : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत भारताने पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचे मुख्यालय आणि त्यांच्या संघटना नष्ट केल्या. भारतीय सैन्याच्या हवाई दलाने हवाई हल्ले करून पाकिस्तानला धडा शिकवला. यानंतर आता केंद्र सरकारकडून पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (IAF) सैनिकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही हवाई दलाचे कौतुक करत त्यांचा गौरव केला आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानमध्ये भितीचे वातवरण पसरल्याचे दिसत होते. हवाई दलाने केलेल्या २५ मिनिटांच्या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानचे इतके नुकसान झाले की संपूर्ण पाकिस्तानात दहशतीचे वातावरण पसरले होते. तर संपूर्ण भारतवासियांकडून भारतीय सैन्याचे तोंडभरून कौतुक होत होते.
PM Narendra Modi: “… तर आम्ही घरात घुसून मारणार; आदमपूर एअरबेसवरून मोदींनी पाकिस्तानला सुनावले
भारतीय सैन्याच्या या यशाचे श्रेय हवाई दलाला जाते, ज्यांनी हवाई हल्ले करून पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशननंतर पाकिस्तानशी संघर्ष सुरू झाला, इथेही हवाई दलाच्या पथकाने उत्तम काम केले. भारतीय हवाई दलाच्या या कामगिरीनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या टीमचा उल्लेख केला आहे. सरकारने पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (IAF) सैनिकांचे फोटो प्रसिद्ध केले.
लष्कराने पाकिस्तानकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना यशस्वीरित्या प्रत्युत्तर देत ते हाणून पाडले. याचे संपूर्ण श्रेय हवाई संरक्षण यंत्रणेला जाते, जिने या प्रदेशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा अबाधित राखली. दरम्यान, एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चा भाग असलेल्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टिम (IACCS) टीमचे सदस्य दिसत आहेत.
Monsoon News: खुशखबर! मान्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला पाऊस येणार
सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचा एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचा फोटो – ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी महत्त्वाचा.’डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही हवाई संरक्षण प्रणालीचे कौतुक केले आहे.
Picture of the Integrated Air Command and Control System released—crucial to the success of Operation Sindoor.#OperationSindoor pic.twitter.com/spabxZS1Pt
— MyGovIndia (@mygovindia) May 12, 2025
सोमवारी (१२ मे) राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी मुक्तपणे फिरत आहेत. भारताने त्यांना एका झटक्यात धूळ चारली. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये चांगलीच दहशत पसरली होती. तो निराश झाला आणि या निराशेत त्याने आणखी एक चूक केली. भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देण्याऐवजी, त्यांनी भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्तानने आमच्या शाळा, महाविद्यालये, गुरुद्वारा, मंदिरे आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केले. पाकिस्तानने आपल्या पवित्र स्थळांना लक्ष्य केले. पण यामध्ये पाकिस्तान स्वतःच उघडा पडला. जगाने पाहिले की पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतासमोर दगडासारखे कसे कोसळले. भारताच्या शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांचे हल्ले हवेतच परतून लावले.