नितीश यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हालचाली; चिराग पासवान यांच्यासाठी भाजपचा डाव?
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा आता मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांचा बिहारच्या राजकारणात उतरण्याचा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय सहज जाहीर झालेला नाही. या निर्णयामागे भाजपाचेच अदृश्य हात असल्याचे बोलले जातं आहे.
पासवान यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला आणखी वर आणण्यासाठी आवश्यक पटकथेचे भाजपा तर लेखन करीत नाही ना, असा विचार करण्यास निश्चितच वाव आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चिराग पासवान यांच्या गेल्या काही आठवड्यांमधील वक्तव्यामध्येच चिराग यांच्या राजकारणाची उत्तरे सापडतील, चिराग पासवान यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही, याची खुद्द त्यांनाही कल्पना आहेच. राज्याच्या एकूणलोकसंख्येत दलितांची संख्या १९.६५ टक्के आहे. त्यात २२ प्रवर्ग आहेत. चिराग पासवान हे पासवान जातीचे आहेत. या जातीची लोकसंख्येच्या पाच टक्के आहे. बाकीचे दलित आहेत. उर्वरित उपजातींचे विविध नेते आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चा, जेडीयू, आरजेडी, भाजपा असे विविध नेते त्यासाठी दावेदार आहेत. काँग्रेस दलित मतांबाबतही गंभीर आहे. चिराग पासवान यांची यंदाच्या बिहार निवडणुकीत भूमिका महत्त्वाची आहे. सन २०२० च्या निवडणुकीत चिराग यांचा पक्ष एनडीए पासून वेगळा लढला आणि नीतिशकुमार यांच्या पक्षाचेही त्यांनी नुकसान केले. जेडीयू ४३ जागांपर्यंत घसरला. मात्र, एलजेपीला केवळ एक जागा जिंकता आली.
चिराग पासवान स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हनुमान म्हणत असत. लोक प्रश्न विचारत आहेत की, जर तो अजूनही हनुमानाच्या भूमिकेत येत असेल तर तो कोणाला हानी पोहोचवेल? याचे कोणतेही स्पष्ट उत्तर नाही. भाजपा अधिक जागा लढवत आहे. जेडीयू मात्र या साऱ्याकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहात आहे. चिराग पासवान यांना पुढे आणणे आणि त्यांना दलित नेताच म्हणून पुढे आणणे, हीच भाजपाची रणनीती आहे. चिराग पासवान यांनी विधान सभा निवडणुकीत इतक्या जागा जिंकल्या पाहिजेत की ते निवडणुकीनंतर भाजपा आणि मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करू शकतील, असंही नियोजन आहे. नीतिशकुमार या सर्व घडामोडींमध्ये कोठेही नसतील.
‘ते योगी नाही तर सत्ताभोगी, स्वतःला फकीर म्हणवणारे…’; काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
लोकजनशक्ती पक्षाला सन २००५ मध्ये पक्षाचे तत्कालीन प्रमुख रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक २९ जागा मिळाल्या. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने ऑक्टोबरमध्ये पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळी पक्षाला दहा जागा जिंकता आल्या. पक्षाने २०१० मध्ये तीन आणि सन २०१५ मध्ये दोन जागा जिंकता आल्या होत्या. पक्षाची कामगिरीपाहता येत्या निवडणुकीतही पक्षाला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.