BJP राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा सस्पेंस कायम; संघ-हायकमांडमध्ये निर्णय बाकी
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड प्रक्रिया खूपच लांबणीवर पडल असल्याचे दिसत आहे. रष्ट्रीय अध्यक्षपदाच्या यादीत अनेकांची नावे समोर आली असली तरी अद्याप कोणतेही एक निश्चित नाव समोर आलेले नाही. सूत्रांनुसार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यात संभाव्य नावांवर एकमत झालेलं नाही. त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीचा निर्णय प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे.
या पदावर कोणताही नवा चेहरा आला, तरी त्याला काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाला २०२५ मधील बिहार विधानसभा निवडणुकांपासून सुरू होणाऱ्या आगामी निवडणुकींचा सामना करावा लागेल. यानंतर २०२६ मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुका त्यांच्यासाठी खरी कसोटी ठरणार आहेत.
भाजपच्या संविधानानुसार, पक्षाचे किमान १९ राज्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडता येतो. आतापर्यंत पक्षाने ३७ पैकी १४ राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. उर्वरित महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक या महत्त्वाच्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्याही प्रलंबित आहेत.
भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. यामुळे पुढील काही आठवडे भाजपसाठी संघटनात्मक दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नवीन अध्यक्षाची घोषणा केली जाऊ शकते. सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला असला, तरी आता नव्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे.
मनोहर लाल खट्टर : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री. वय ७०-७१ वर्षे असल्याने वयोमर्यादा हा अडथळा ठरू शकतो, तरीही त्यांचे नाव प्रमुख दावेदारांमध्ये गणले जात आहे.
धर्मेंद्र प्रधान : केंद्रीय शिक्षणमंत्री. संघ परिवारात आणि संघटनात मजबूत पकड असल्यामुळे त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
भूपेंद्र यादव : केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ रणनीतीकार. संघटनात्मक कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनात निपुण.
निर्मला सीतारमण : केंद्रीय अर्थमंत्री. पक्षाच्या महिला नेतृत्वाला प्राधान्य दिल्यास त्यांचे नाव पुढे येऊ शकते. भाजपच्या इतिहासात महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड ऐतिहासिक ठरू शकते.
भयानक दिसणाऱ्या बाहुल्यांनी जगाला घातलीये भुरळ! ‘Labubu Doll’ आवडण्याचे नक्की कारण
सध्या ३७ राज्यांपैकी फक्त १४ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित महत्त्वाच्या राज्यांमध्ये
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल — अजूनही प्रदेशाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू नाही.
महाराष्ट्र: महाराष्ट्रात मार्ग थोडा सोपा दिसतोय. मराठा समाजातून आलेले रवींद्र चव्हाण यांची आधीच कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या त्यांच्या जवळीकतेमुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपवणे सोपे होत आहे. भाजपच्या संघटन रचनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यापूर्वी बहुसंख्य राज्यांमध्ये प्रदेशस्तरीय निवडणुका पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पक्ष सध्या संघटनात्मक पायाभरणीवर भर देत आहे.
भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून ती राज्य पातळीवरील संघटनात्मक समतोलावरही अवलंबून आहे. सध्या अनेक राज्यांत अध्यक्षपदासाठीची स्थिती गुंतागुंतीची आहे. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वासाठी एकमत होणे कठीण ठरण्याची शक्यता आहे.
सध्या अनेक राज्यांतील नियुक्त्या प्रलंबित असल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षाच्या घोषणेवरही परिणाम होतो आहे. भाजपला अशा चेहऱ्याची गरज आहे, जो केवळ संघटना मजबूत करेल असं नव्हे, तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळू शकेल.