अमृतसर प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे निर्देश (फोटो -istockphoto)
अमृतसर: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान काल पाकिस्तानने भारताच्या अनेक महत्वाच्या ठिकाणी ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला. राजधानी इस्लामाबाद, सियालकोटसह महत्वाच्या शहरांवर मिसाईल डागण्यात आली.
भारतीय नौदल, लष्कर आणि वायुसेनेने पाकिस्तानवर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतने कराची बंदरावर हल्ला केला. पाकिस्तानने अमृतसर, जम्मू काश्मीर, राजस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. दरम्यान देशभरात मॉक ड्रिलचा आणि ब्लॅकआउटचा सराव करण्यात आला आहे. त्यानंतर आता भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अमृतसर प्रशासनाने काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. अमृतसरमध्ये या पुढे कोणतेही मॉक ड्रिल केले जाणार नाही असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र आता सायरन वाजवण्यात आला तर, तर तो थेट हल्ल्याची माहिती दर्शवेल. या प्रकारचा सायरन वाजल्यास त्वरित ब्लॅकआउट करणे अनिवार्य असेल. हल्ल्याच्या वेळेस जे निर्देश देण्यात येतील त्याचे कटकोरपणे पालन करावे लागेल असे स्पष्ट निर्देश अमृतसर प्रशासनाने दिले आहेत.
सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई
भारताने हवाई दल, नौदल आणि लष्कर तीनही दलांनी पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बीएसएफचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. भारत पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच 7 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नांत होते. सात दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र आधीपासूनच सीमेवर तैनात आणि सजग असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी या 7 ही घुसखोरांना कंठस्नान घातले आहे.
India Vs Pakistan War Live: सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई; 7 दहशतवाद्यांचा खात्मा
इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले
पाकिस्तानने काल दिवसभरात जम्मू एअरपोर्टवर मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर या शहरात भारताने मोठे हल्ले केले आहेत. तर आता भारतीय हवाई दलाचे तेजस, सुखोई ही लढाऊ विमाने सीमेवर घिरट्या घालत आहेत. कुपवाडा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे.
भारताने एका बाजूने काउंटर अटॅक केला असतानाच पाकिस्तानमध्ये बलुच आर्मीने देखील पाकिस्तानच्या सैन्य दलांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला नक्की कोणाचा सामना करायचं हे समजत नाहीये. पाकिस्तानने त्यांच्या आर्मी चीफ असीम मुनिरला देखील अटक केल्याचे समजते आहे. बलुच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर भीषण हल्ले चढवले आहेत.