जम्मू-काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्नान (फोटो- बीएसएफ)
श्रीनगर: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानने काल दिवसभरात भारताच्या महत्वाच्या शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने काउंटर अटॅक केला आहे. पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांमध्ये मोठे हल्ले करत भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने मोठी कारवाई केली आहे.
भारताने हवाई दल, नौदल आणि लष्कर तीनही दलांनी पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बीएसएफचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. भारत पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच 7 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नांत होते.
सात दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र आधीपासूनच सीमेवर तैनात आणि सजग असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी या 7 ही घुसखोरांना कंठस्नान घातले आहे.
इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले
पाकिस्तानने काल दिवसभरात जम्मू एअरपोर्टवर मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर या शहरात भारताने मोठे हल्ले केले आहेत. तर आता भारतीय हवाई दलाचे तेजस, सुखोई ही लढाऊ विमाने सीमेवर घिरट्या घालत आहेत. कुपवाडा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे.
भारताने एका बाजूने काउंटर अटॅक केला असतानाच पाकिस्तानमध्ये बलुच आर्मीने देखील पाकिस्तानच्या सैन्य दलांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला नक्की कोणाचा सामना करायचं हे समजत नाहीये. पाकिस्तानने त्यांच्या आर्मी चीफ असीम मुनिरला देखील अटक केल्याचे समजते आहे. बलुच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर भीषण हल्ले चढवले आहेत.
India Vs Pakistan War Live: पाकिस्तानवर दुहेरी संकट; इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले
पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. राजधानीवर देखील भारताने हल्ला केला आहे. तर भारतीय नौदललाने आयएनएस विक्रांतने पाकिस्तानच्या कराची बंदरावर मोठा हल्ला केला आहे.
भारत पाकिस्तान युद्ध सुरु
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानने भारतावर मिसाईन आणि ड्रोन अटॅक सुरु केला आणि त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्यर दिले आहे. भारताच्या अनेक ठिकाणी पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली मात्र भारताने प्रतित्युत्यर दिल्यानंतर आता भारताने लाहोरमध्ये कारवाई केली आहे. भारताने चार विमान नेस्तनाबूत केली आहे अशी माहिती समोर आली आहे. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि यामध्ये असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटामुळे हादरल्याची माहिती समोर आली आहे.