जगातील ६००० अपघातांमध्ये बोईंग विमानाचा अपघातात ९००० मृत्यू झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 274 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग विमान AI-171 चा भीषण अपघात झाला. यामधील एक प्रवासी सोडून बाकी सर्व प्रवासी व क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघातानंतर बोईंग विमानांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बोईंग विमानांच्या सुरक्षा आणि तांत्रिक त्रुटींबद्दल यापूर्वीही बातम्या आल्या आहेत. कधीकधी एअरलाइन्सची बॅटरी सदोष असल्याचे आढळून आले तर कधीकधी विमानाचा दरवाजा हवेतच तुटला आहे. यामुळे प्रवाशांच्या मनामध्ये बोईंग विमानाबाबत धास्ती निर्माण झाली आहे.
अहमदाबाद अपघातानंतर, विमानातील प्रवासाबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. कधीकधी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले तर कधीकधी अनेक तांत्रिक त्रुटींमुळे उड्डाण रद्द करावे लागले आहेत. विमानातील लाईट गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत. यावेळी प्रवासी विमानामध्ये हनुमान चालीसा म्हणत असल्याचे दिसून आले. जगभरात अनेक विमान अपघात झाले आहेत, मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गेल्या दशकात, जवळजवळ अर्धे अपघात बोईंग विमानांचे झाले आहेत. फक्त भारताबद्दल विचार केला तर गेल्या दशकात दोन मोठे अपघात झाले आणि दोन्ही विमाने बोईंगची होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकेकाळी सर्वात विश्वासार्ह मानले जाणारी बोईंग विमानाबाबत आता संशय घेतला जात आहे. बोईंग विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 161.36 अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेली बोईंग कंपनी अपघातांसाठी कुप्रसिद्ध झाली. अमेरिकन वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्सनुसार, बोईंगच्या 108 वर्षांच्या इतिहासात 6000 हून अधिक विमान अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये हजारो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. बोईंग विमानांचे 450 हून अधिक अपघात झाले आहेत, ज्यात 583 लोकांचा मृत्यू झाला आहे.
2013 मध्ये, बोईंगच्या ड्रीमलायनरला बॅटरी संबंधिच्या समस्या आल्या. बोईंगच्या लिथियम-आयन बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे जपानमधील दोन विमानांना आग लागली. त्यानंतर बोईंगच्या ड्रीमलायनरवर तीन महिन्यांसाठी उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली. 2013 मध्येच लंडनमध्ये धावपट्टीवर उभ्या असलेल्या एका विमानाला आग लागली, कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात आले. 2021 मध्ये केलेल्या तपासणीदरम्यान, 100 हून अधिक ड्रीमलाइन विमानांच्या विद्युत प्रणालींमध्ये दोष आढळून आले, त्यानंतर त्यांना ग्राउंड करण्यात आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
१६१.३६ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली बोईंग कंपनी अपघातांसाठी कुप्रसिद्ध झाली. अमेरिकन वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्सनुसार, बोईंगच्या 108 वर्षांच्या इतिहासात ६००० हून अधिक विमान अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ९००० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. बोईंग विमानांचे ४५० हून अधिक अपघात झाले आहेत, ज्यात २ ते ५८३ लोकांचा मृत्यू झाला आहे. बोईंग विमानांच्या सुरक्षा आणि तांत्रिक त्रुटींबद्दल यापूर्वीही बातम्या आल्या आहेत. कधीकधी एअरलाइन्सची बॅटरी सदोष असल्याचे आढळून आले तर कधीकधी विमानाचा दरवाजा हवेतच तुटला.
बोईंगला १६० दशलक्ष डॉलर्सची भरपाई
२०२४ मध्ये, सिडनीहून ऑकलंडला जाणारे एक बोईंग विमान हवेतच थरथरू लागले. त्याच वर्षी, सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानाच्या विंडस्क्रीनला हवेतच तडा गेला. २०२४ मध्ये, अलास्का एअरलाइन्सच्या उड्डाणादरम्यान बोईंग विमानाचा दरवाजा तुटला. या अपघातानंतर बोईंगला १६० दशलक्ष डॉलर्सची भरपाई द्यावी लागली. एवढेच नाही तर बोईंग विमाने, कधी आगीचा इशारा, कधी विंडस्क्रीनमध्ये भेगा, तर कधी लँडिंग गियर अडकल्याच्या अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या.