सलीम कुत्तासोबत फोटो असलेले सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे संजय राऊत यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sudhakar Badgujar Marathi News : मुंबई : राज्यामध्ये सध्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरुन राजकारण रंगले आहे. शिवसेना ठाकरे गटातून बडतर्फे करण्यात आलेलेल बडगुजर हे भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. मुंबईमध्ये भाजप वरिष्ठ नेत्यांच्या साक्षीने बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना या पक्षप्रवेशाबद्दल काहीच माहिती नसल्याचे म्हटल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच नाशिकच्या स्थानिक नेत्यांकडून देखील या पक्षप्रवेशाला विरोध केला जात आहे. आता सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश होत असल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंना डिवचले आहे.
सुधाकर बडगुजर हे 2023 या वर्षी देखील चर्चेमध्ये आले होते. त्यांचा अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे दिसून आले होते. सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता सोबत नाचताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन भाजप नेते बडगुजर यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. यामध्ये प्रामुख्याने आशिष शेलार आणि नितेश राणे यांचा समावेश होता. नितेश राणे यांनी 2023 मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करुन टीका होती. याचवरुन आता खासदार संजय राऊत यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नितेश राणे यांची विधानसभेमधील हिवाळी अधिवेशनाची व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये ते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गरळ ओकाताना दिसत आहेत. यावर संजय राऊतांनी राणेंना टोला लगावला आहे. त्यांनी लिहिले की, ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट ..”झाला रे… बॉम्ब ब्लास्ट मधील सलीम कुत्ता चे बॉस भा ज पा मध्येच बसलेत! असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.
या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे!
गृह मंत्री फडणवीस तुमचे लोक त्या सलीम कुत्ता ला उगाच बदनाम करीत होते; भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष आहे,
देशभक्ती, हिंदुत्व वगैरे सगळे ढोंग आहे!@Dev_Fadnavis @cbawankule @JPNadda @AmitShah https://t.co/RomcRaHDiq— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2025
तसेच आणखी एका पोस्टमध्ये संजय राऊत म्हणाले की, या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे!
गृह मंत्री फडणवीस तुमचे लोक त्या सलीम कुत्ता ला उगाच बदनाम करीत होते; भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष आहे, देशभक्ती, हिंदुत्व वगैरे सगळे ढोंग आहे! अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार. बडगुजर आता 100 टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरु आहे. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता. त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही,” अशी प्रतिक्रिया आता मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.