
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आज धमकीचे पत्र मिळाले आहे. दोन न्यायमूर्तींनी मालमत्ता कर प्रकरणात प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
नागपूर : नागपुरातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Bombay High Court’s Nagpur Bench ) एक धमकीवजा पत्र प्राप्त झाले आहे. नागपूर खंडपीठाला 11 ऑक्टोबर रोजी हे पत्र प्राप्त झाले आहे. वरुड नगरपरिषदेच्या मालमत्ता करवाढीला आव्हान देणाऱ्या प्रभाकर काळे यांच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींनी प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांच्यावर बॉम्ब हल्ला (Bomb Threat) केला जाईल, असे त्या पत्रात म्हणण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, नागपूर खंडपीठाला 11 ऑक्टोबर रोजी हे पत्र प्राप्त झाले असून वरुड नगरपरिषदेच्या मालमत्ता करवाढीला आव्हान देणाऱ्या प्रभाकर काळे यांच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींनी प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांच्यावर बॉम्ब हल्ला केला जाईल, असे म्हटले होते. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील याचिकाकर्त्याची करण्यात आली चौकशी
हे पत्र काळे यांच्या नावाने पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आणि न्यायालय प्रशासनाने तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. ते म्हणाले की अमरावती ग्रामीण पोलिसांनी याचिकाकर्त्याची चौकशी केली, त्यांनी धमकीचे पत्र लिहिण्यात कोणताही सहभाग नाकारला.
अधिकाऱ्याने सांगितले की, काळे यांच्या वकिलांनीही त्यांच्या विधानाची पुष्टी केली आणि असे सुचवले की, काळे यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे पत्र पाठवले गेले असावे.
पोलीस सिसिटिव्ही तपासत आहे
ते म्हणाले की पत्राचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे आणि पोलिस महत्त्वाच्या संकेतांसाठी जवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.