नवी दिल्ली – एक मृतदेह, दोन दावेदार. कौशांबी येथील एका मुस्लिम कुटुंबाने तरुणाचा मृतदेह रमजान म्हणून सुपुर्द-ए-खाक केला आहे. त्यावरच फतेहपूरच्या एका हिंदू कुटुंबानेही दावा केला. हा मृतदेह त्यांचा मुलगा सूरजचा असल्याचे ते सांगतात. दोन्ही कुटुंबीयांच्या दाव्यात पोलीस-प्रशासन संभ्रमात पडले आहे. सत्य जाणून घेण्यासाठी 3 जुलै रोजी कबरीत पुरलेला मृतदेह 19 दिवसांनी बाहेर काढण्यात आला.
मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले. आता दोन्ही कुटुंबांचे नमुने मॅच करून पाहण्यात येणार आहेत. म्हणजेच आता हा मृतदेह सुरजचा आहे की रमजानचा, हे डीएनए चाचणीच्या अहवालावरून स्पष्ट होणार आहे. 11 जून रोजी सैनी कोतवाली येथील दिल्ली-हावडा ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तपास केला असता तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. ओळखण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटू शकली नाही. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पाठवण्यात आला.
डीएमच्या आदेशानंतर दोन्ही कुटुंबीयांना बोलावण्यात आले. 3 जुलै रोजी, मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि डीएनए नमुना घेण्यात आला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे केस, नखे, त्वचा आणि रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. यानंतर मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. डीएनए नमुना लखनऊच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. आता अहवाल आल्यानंतरच कबरीत दफन असलेला मृतदेह कोणाचा आहे हे समजेल.