लखनऊ : मागील वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या (Ayoddhya) दौरा करणार होते. यावेळी या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh )यांनी मोठा विरोध केला होता. तसेच मुंबईत ज्या उत्तर भारतीयांना राज ठाकरे व त्यांच्या पक्षाने मारहण केली होती. त्या राज ठाकरेंना अयोध्या किंवा यूपीत राज ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही, असा पवित्रा भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेत, राज ठाकरेंच्या यूपी दौऱ्याला विरोध केल्याने, त्यावेळी राज ठाकरे अयोध्याला जाऊ शकले नव्हते, मात्र आता यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले बृजभूषण सिंह?
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना आता उपरती झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज ठाकरेंना विरोध करणार सिंह यांचा विरोध आता मावळला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नसून, त्यांचे स्वागतच करू, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच मागील वेळी राज ठाकरेंनी माघार घेत, अयोध्या वारी केली नव्हती यातच त्यांना आम्ही माफ करु असं देखील सिंह म्हणाले.
राज ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नाही…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्यावर जात रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्री अयोध्येला गेले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानांबद्दल जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणाच बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यामुळे तणवपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आता बृजभूषण सिंह यांनी आपले राज ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नव्हते, त्यांनी एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच केला आहे, असे म्हटले आहे.