yediyurappa

पोक्सो अॅक्ट (POCSO Act) अंतर्गत येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षांच्या मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरुन येदियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा (B.S. Yediyurappa) यांच्यावर पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका 17 वर्षाच्या मुलीच्या आईनं ही तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.

    नेमकं प्रकरण काय

    रिपोर्ट नुसार, कर्नाटकमधील सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (81) यांच्यावर गुन्हा दाखल केला. एका 17 वर्षाच्या मुलीनं त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 (POCSO) च्या कलमाखाली कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    17 वर्षाच्या मुलीच्या आईनं केली तक्रार

    वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईनं गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.