Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक आयोग सज्ज, मतदारांच्या सोयीसाठी लाँच केलं QMS App
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग तयारी करत आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन अॅप लाँच केलं आहे, ज्यामुळे मतदारांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे. लोकांना मतदान करणे सोपे व्हावे म्हणून, यासाठी अनेक व्यवस्था केल्या जातात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने एक नवीन QMS अॅप लाँच केले आहे, ज्याच्या मदतीने मतदारांना बूथवरील बरीच माहिती उपलब्ध होणार आहे.
फोटो आणि व्हिडिओ क्लिक करताना GPS बंद करणं आहे गरजेचं, काय आहे यामागील कारण? जाणून घ्या
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या मतदानापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी QMS अॅप लाँच केले आहे. मतदारांना मतदानावेळी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी हे नवीन अॅप लाँच करण्यात आलं आहे. या अॅपद्वारे वापरकर्ते कोणत्याही मतदान केंद्राबाहेरील रांगेबद्दल अपडेट मिळवू शकतात. मतदानावेळी आपल्याला मतदान केंद्राबाहेर किती काळ वाट पाहावी लागणार आहे, मतदान केंद्राबाहेर किती रांग आहे, याबाबत QMS अॅपवरून माहिती मिळणार आहे. यासोबतच त्यांना या अॅपद्वारे मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याचा मार्गही मिळेल. (फोटो सौजन्य – X)
निवडणूक आयोगाने QMS अॅप अँड्रॉइड मोबाईल आणि लॅपटॉपसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे QMS-अॅप कोणताही डेटा गोळा करत नाही किंवा कोणत्याही तृतीय पक्षासोबत डेटा शेअर करत नाही. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते. निवडणूक आयोगाने या अॅपला ‘तुमचा मतदान दिवसाचा साथीदार!’ असे नाव दिले आहे.
🚨📢 Voting Made Easier Queue Management Solution(QMS) at Polling Stations for Delhi Assembly Election 2025!
🗳The QMS mobile app enhances your voting experience by offering live:-
1. Queue Updates:
Real-time status of queues at
your polling station2. Estimated Waiting Time:… pic.twitter.com/JbweE4tHet
— DCP OUTER DELHI (@dcpouter) January 31, 2025
या अॅपचे एकाच वेळी अनेक फायदे होणार आहेत. त्याच्या मदतीने, मतदारांना मतदान केंद्राबाहेर किती वेळ घालवता येईल हे कळू शकेल. अशा परिस्थितीत, मतदार संपूर्ण योजना आखून घराबाहेर पडेल. त्याला मतदान केंद्राबाहेर असणाऱ्या रांगेचीही माहिती मिळणार आहे. जर केंद्रावर लांब रांग असेल तर मतदार त्याचे इतर काम पूर्ण करून मतदान केंद्रावर पोहोचू शकतो. नेव्हिगेशनमुळे, त्याला मतदान केंद्राकडे जाण्यासाठी कोणालाही रस्ता विचारण्याचीही गरज भासणार नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी 5 वाजता संपला. आता 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. अनेक नेत्यांनी रोड शोच्या माध्यमातून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. बुधवारी, दिल्लीतील हाय प्रोफाइल जागा नवी दिल्ली, कालकाजी, विश्वास नगर आणि जंगपुरा या सर्व 70 विधानसभा जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे.
दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते, राजधानीतील 13,766 मतदान केंद्रांवर 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, त्यापैकी 83.76 लाख पुरुष आणि 72.36 लाख महिला मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदान बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी होईल. दिल्लीत मतदान प्रक्रिया या दिवशी सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. तथापि, जे लोक संध्याकाळी 5 वाजल्यानंतरही मतदानासाठी रांगेत उभे आहेत त्यांनाही मतदान करण्याची संधी मिळेल. निवडणूक आयोगाने मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोल सर्वेक्षणावर बंदी घातली आहे.