सौजन्य : सोशल मीडिया
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात नव्याने सरकार स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार, एन. चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी भेट घेऊन एक मोठी मागणी केली आहे. राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रस्ताव मांडले व केंद्र सरकारची मदत मागितली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देता येत नसेल, तर त्याला आणखी मदत द्यावी, असा प्रस्ताव नायडू यांनी केंद्र सरकारला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सर्वात मोठा सहयोगी आहे. राष्ट्रीय राजधानीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या टीडीपी प्रमुखांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांच्याशी राज्याशी संबंधित समस्यांवर चर्चा केल्याची माहिती दिली जात आहे. तसेच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह इतर अनेक केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहेत.
2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर राज्याच्या विकासासाठी केंद्राचा पाठिंबा मिळविण्यासाठी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रस्ताव मांडले व केंद्र सरकारची मदत मागितली.
विशेष राज्याचा दर्जा देता येत नसेल तर…
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देता येत नसेल, तर त्याला आणखी मदत द्यावी, असा प्रस्ताव नायडू यांनी केंद्र सरकारला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता नायडूंनी पंतप्रधानांकडे ही मागणी केली असली तरी पंतप्रधान मोदी आणि त्यांचं केंद्रातील सरकार यावर काय निर्णय घेते हे येत्या दिवसांत समजणार आहे.