'मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार, काही शंका'; सिद्धरामय्या यांच्या भूमिकेमुळे डीके शिवकुमार यांची पंचाईत
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बुधवारी राज्यातील नेतृत्व बदलाचं खडंन करत, ‘मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार, यात काही शंका आहे का?” असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मनषा बाळगणाऱ्या डीके शिवकुमार यांची मात्र पंचाईत झाली आहे. दरम्यान सिद्धारमय्या यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या विधानामुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे समोर आली आहे.
Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “माझ्याकडे काय पर्याय आहे? मला त्यांच्या (सिद्धारमैया) सोबत राहावेच लागेल, त्यांना पाठिंबा द्यावा लागेल. हायकमांड जो आदेश देईल, तोच मला मान्य करावे लागेल.” काँग्रेसच्या अनेक आमदारांनी गेल्या काही आठवड्यांपासून उघडपणे शिवकुमार यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत, त्यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणी केली आहे. अशा पार्श्वभूमीवर दोन्ही वरिष्ठ नेत्यांची वक्तव्ये लक्षवेधी ठरली आहेत.
सिद्धारामय्या यांच्या विधानाचे राजकीय अर्थ लावले जात असून काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चा बंद होण्यासाठी त्यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारीच काँग्रेसचे प्रभारी महासचिव रणदीप सुरजेवाला यांनीही स्पष्ट केलं होतं की, “कर्नाटकमध्ये सध्या नेतृत्वबदलाची कोणतीही योजना नाही.” त्यानंतर लगेच सिद्धारामय्या यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत भाजपच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं.
काँग्रेस सिद्धारामय्या यांना कार्यकाळ पूर्ण होत असल्याने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून हटवू शकते, असा दावा भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात होता. मध्यावर हटवू शकते. यावर उत्तर देताना सिद्धारामय्या म्हणाले, “भाजप काहीही बोलत राहणार, पण ते आमचे हायकमांड नाहीत. आमच्या पक्षातील निर्णय आमचे नेतृत्वच घेईल, राजकीय विरोधक नव्हे, असा टोला लगावला आहे.
दरम्यान, याआधी शिवकुमार यांनीही स्पष्ट केले होते की, त्यांना मुख्यमंत्री होण्याची सध्या कोणतीही इच्छा नाही. त्यांनी आपले लक्ष्य २०२८ मधील विधानसभा निवडणुकीवर केंद्रित असल्याचं सांगितलं. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसमध्ये शिस्त ही सर्वोच्च आहे. मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. मी सध्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही. माझे ध्येय आहे की, २०२८ मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत यावी.”
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनीही काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, कर्नाटकमधील नेतृत्व बदलासंदर्भात कोणताही निर्णय पक्षाच्या हायकमांडकडूनच घेतला जाईल. “या बाबतीत कोणालाही अनावश्यक वाद निर्माण करण्याचा अधिकार नाही,” असे सांगत खरगे यांनीही नेतृत्व बदलाच्या चर्चांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपने त्यांच्या या विधानावरूनही टीका केली आहे.
Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
काँग्रेसने नेतृत्व बदलाचा निर्णय नाकारला असला तरी सिद्धारामय्या आणि शिवकुमार यांच्या वक्तव्यांतून पक्षातील अंतर्गत वाद समोर आला आहे. आता पक्षाच्या हायकमांडकडून या वादाला पूर्णविराम दिला जातो की काही वेगळा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.