पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोंडामधील सभेमध्ये रवींद्र सिंह नेगी यांचे पाय धरले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 70 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या प्रचारासाठी भाजपने मोठा प्लॅन आखला आहे. स्टार प्रचारकांसह शेजारील राज्यातील नेते देखील जोरदार प्रचार करत आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. मात्र प्रचारावेळी पंतप्रधान मोदी हे चक्क एका तरुण उमेदवाराची खाली वाकून पाया पडले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे मंचावरील सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दिल्लीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र त्यांच्या टीकेपेक्षा त्यांची एक कृतीची जोरदार चर्चा सुरु आहे. घोंडा येथे पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी सर्व उमेवारांना मंचावर बोलावले होते. उमेदवार येऊन नरेंद्र मोदींची भेट घेतल होते तसेच त्यांचे आशिर्वाद घेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी त्यांच्या पाया पडत असलेल्या व्यक्तीला अडवतात. कोणाला नरेंद्र मोदी हे पाया पडून देत नाहीत. मात्र दिल्लीच्या टपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असलेल्या रवींद्र सिंह नेगी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाया पडले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे उमेदवार असलेल्या रवींद्र सिंह नेगी यांच्या एकदा नाही तर तीन वेळा पाया पडले आहेत. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मंचावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. नेगी यांच्यानंतर विश्वास नगरचे उमेदवार ओम प्रकाश शर्मा यांनीही मोदी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मध्येच अडविण्यात आले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा पाया पडलेले अनेक नेटकऱ्यांना आवडलेले नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये १.२० ते १.२६ सेकंदाला पंतप्रधान मोदींनी केलेल्या कृती चर्चेचा विषय ठरत आहे.
VIDEO | Delhi Elections 2025: PM Modi (@narendramodi) meets BJP candidates during ‘Sankalp Rally’ at Kartar Nagar.#DelhiElectionsWithPTI #DelhiElections2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/H3sM0z63h3
— Press Trust of India (@PTI_News) January 29, 2025
कोण आहेत रवींद्र सिंह नेगी?
रवींद्र सिंह नेगी हे सध्या विनोद नगरमधून नगरसेवक आहेत. हा विभाग पटपडगंज विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. रवींद्र सिंह नेगी हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेच्या वर्तुळामध्ये आले आहेत. त्यांनी काही व्हिडीओ शेअर केले होते, ज्यामुळे वाद उद्भवला. पश्चिम विनोद नगर येथे असलेल्या एका डेअरीच्या समोर उभे राहून नेगी यांनी डेअरी चालकाला धमकावले होते. अल्तमश तोमर नामक मालकाच्या डेअरीचे नाव फक्त तोमर ठेवण्यात आले होते. नेगींचे म्हणणे होते की, तुमचे पहिले नाव जे काही असेल, तेही दुकानावर दिसले पाहीजे. फक्त तोमर लिहून चालणार नाही. जर पूर्ण नाव दुकानावर लिहिले नाही तर दुकान बंद करू, अशीही धमकी त्यांनी दिली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याशिवाय नेगी यांनी हिंदू फेरीवाल्यांनाही आवाहन करत असताना भगवा झेंडा गाडीवर लावण्यास सांगितले होते. तसेच हिंदू सणांआधी त्यांनी खाटिकाच्या दुकानाला भेट देऊन सणांच्या काळात दुकान बंद ठेवण्यास सांगितले होते, यामुळे रवींद्र सिंह नेगी हे चर्चेत आले आहेत. रवींद्र सिंह नेगी यांच्याविरोधात आम आदमी पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मागील निवडणुकीमध्ये उभे होते. अगदी कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता.