अमेठी : अमेठी लोकसभा निवडणुकीमध्ये (Amethi Lok Sabha) भाजपला उतर प्रदेशमध्ये मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. अमेठीमध्ये स्मृती इराणी पराभूत झाल्या आहेत. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसचे उमेदवार के. एल. शर्मा (K. L. Sharma) 50,758 मतांनी आघाडीवर होते.
त्यावेळी प्रतिक्रिया देताना किशोरीलाल शर्मा म्हणाले की, या विजयाचे श्रेय अमेठीतील जनतेला आणि गांधी परिवाराला आहे. पक्षाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे प्रतिनिधी आणि पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे. केएल शर्मा निवडणुकीच्या रणनीतीचे प्रभारी होते.
के. एल. शर्मा मूळचे लुधियानाचे आहेत. गांधी घराण्याशी ते दीर्घकाळापासून जवळचे आहेत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये ते निवडणुकीची रणनीती बनवण्याचे आणि अंमलात आणण्याचे काम करत आहेत.
सोनियांसाठी किशोरी लाल चाणक्याची भूमिका साकारणार असल्याचे मानले जाते. 1983 पासून ते रायबरेली आणि अमेठीमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. प्रियंका गांधी यांनी किशोरीलाल यांचे अभिनंदन केले असून ते विजयी होतील, अशी खात्री होती असे म्हटले आहे.