भारतीय निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचा कॉग्रेस राहुल गांधी यांनी आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Rahul Gandhi On EC : नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूरवरुन जोरदार चर्चा पार पडली आहे. त्यानंतर आता विरोधकांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. जनतेच्या मतांच्या चोरी करत असून हा सर्वात मोठा राष्ट्रद्रोह असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी अलिकडेच निवडणूक आयोगावर खूप गंभीर आरोप केले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मते चोरत’ असल्याचा दावा केला आहे. राहुल म्हणाले की त्यांच्याकडे असलेले पुरावे ‘अणुबॉम्ब’सारखे आहेत, त्यानंतर आयोगाला स्फोट झाल्यानंतर लपण्यासाठी जागा मिळणार नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “मी आधीच अनेक वेळा म्हटले आहे की मते चोरीला जात आहेत. आता आमच्याकडे याचे पूर्णपणे ठोस पुरावे आहेत. निवडणूक आयोग मत चोरीत सहभागी आहे आणि मी हलके बोलत नाहीये, मी १०० टक्के पुराव्यांसह बोलत आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
निवडणूक आयोग मते चोरत आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असा दावा केला की आम्ही हे जाहीर करताच संपूर्ण देशाला कळेल की आयोग मते चोरत आहे. निवडणूक आयोग हे सर्व भाजपसाठी करत आहे. निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही. काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, “आम्हाला मध्य प्रदेशात (विधानसभा निवडणुकीत) शंका होत्या, लोकसभा निवडणुकीतही शंका होत्या, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही मतदार जोडले गेले. यानंतर आम्ही आमची चौकशी सुरू केली आणि त्याला सहा महिने लागले. आम्हाला जे सापडले आहे तो अणुबॉम्ब आहे, जेव्हा ते स्फोट होईल तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
निवडणूक अधिकारी देशद्रोह करत आहेत
राहुल गांधींनी इशारा दिला की मी खूप गंभीरपणे सांगत आहे की निवडणूक आयोगात हे काम जो कोणी करत असेल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, हा देशद्रोह आहे. तुम्ही निवृत्त झाला असाल किंवा तुम्ही कुठेही असाल, आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा थेट इशारा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने असा दावा करत आहेत की त्यांच्या पक्षाने कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघात मतदार यादीचे ऑडिट केले आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे आणि त्याची माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल.
VIDEO | Parliament Monsoon Session: Congress MP and LoP Lok Sabha Rahul Gandhi (@RahulGandhi) says, “We have said that there is a theft of votes happening and now we have open and shut proof that the Election Commission is involved in theft of votes. I am not saying it lightly, I… pic.twitter.com/4NhzijjrTp
— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2025
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
२४ जुलै रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. आयोगाने म्हटले होते की लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने केवळ “निराधार आरोप” केले नाहीत तर एका संवैधानिक संस्थेला “धमकी” देण्याचा प्रयत्न केला आहे.