शार्दुल ठाकूर(फोटो-सोशल मीडिया)
Mumbai team announced for Ranji Trophy 2025 : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबई संघ जाहीर करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या १६ सदस्यीय मुंबई संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे. मुंबई संघात अनुभवी अजिंक्य रहाणे आणि स्थानिक क्रिकेटमध्ये रन-मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरफराज खान यांचा देखील समावेश केला गेला आहे. या अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शार्दुल ठाकूरची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘ना भारताने विचारले ना काही…’, आशिया कप ट्रॉफीबाबत मोहसीन नक्वीची भूमिका वाकडी ती वाकडीच..
मुंबईच्या संघामध्ये युवा खेळाडू मुशीर खान, आयुष म्हात्रे आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचा देखील समावेश आहे. श्रेयस अय्यर संघातून अनुपस्थित आहे. कारण, त्याने दीर्घ स्वरूपातील क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. सूर्यकुमार यादव देखील मुंबई संघाचा भाग असणार नाही. मुंबईचा दीर्घकाळचा सदस्य राहीलला पृथ्वी शॉ आगामी हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या हंगामात शॉचा संघात समावेश करण्यात आला नव्हता, त्यानंतर त्याने संघ सोडण्याचे पाऊल उचलले.
जाहीर करण्यात आलेल्या मुंबई संघात अनेक प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती असणार आहे, तरी मुंबईच्या संघात तरुण आणि अनुभवाचे चांगले मिश्रण आहे. शार्दुल ठाकूरकडे कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. शार्दुल गोलंदाज आणि फलंदाज या दोन्ही स्वरूपात चांगली कामगिरी करत असतो. जर शार्दुल ठाकूर रणजी ट्रॉफीमध्ये खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली तर त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करणे शक्य होणार आहे.
विक्रमी ४२ वेळा रणजी विजेता असेलला मुंबई संघ १५ ऑक्टोबर रोजी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जम्मू आणि काश्मीरविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. एलिट ग्रुप डी मध्ये स्थान मिळविलेल्या मुंबईचा सामना लीग टप्प्यात हिमाचल प्रदेश, दिल्ली, हैदराबाद, राजस्थान, छत्तीसगड आणि पुडुचेरीशी या संघांसोबत होणार आहे.
हेही वाचा : IND vs WI: यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक डरकाळी!148 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडले असे काही; वाचा सविस्तर
मुंबई संघ : शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूझा, इरफान उमेर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.