अहमदाबाद विमान दुर्घटना (फोटो -सोशल मीडिया)
अहमदाबाद विमान दुर्घटनेत 241 नागरिकांचा मृत्यू
सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल
खरे कारण वेगळेच असल्याची शंका
Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि जमिनीवरचे काही नागरिक मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. दरम्यान आता सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
एका वाहतूक सुरक्षा संघटनेने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी स्वतंत्रपणे न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात अनेह महत्वाची करणे लपवण्यात आल्याचा दावा या जनहित याचिकेतून करण्यात आला आहे.
कॉन्स्टिट्यूशन बाय सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या संस्थेच्या प्रमुखांनी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नागरिकांना सत्यापासून दूर ठेवणे हे त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले आहे. हे सत्य समोर यावे तसेच भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी याची चौकशी कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
12 जुलै रोजी AAIB ने विमान दुर्घटणेच प्राथमिक अहवाल सादर केला होता. विमानाने उड्डाण करताच दोन्ही इंजिनचे इंधन कंट्रोल स्विच एका सेकंदात ‘रन’ वरून ‘कट ऑफ’ वर गेले. यामुळेच विमान दुर्घटनाग्रस्त झाले असे या अहवालात म्हणण्यात आले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत या अहवालात अनेक कारणे लपवली गेल्याच दावा करण्यात आला आहे. महत्वाची माहिती सांगण्यात आलेली नाही असे, याचिकेत सांगण्यात आले आहे.
टेकऑफच्या काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद
अहवालात नोंदवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की, टेकऑफच्या वेळी एका पायलटने एका सहकाऱ्याला विचारले, “तुम्ही इंधन का कमी केले?” उत्तरात, दुसऱ्या पायलटने म्हटले, “मी हे केले नाही. यावरून हे स्पष्ट होते की पायलटने इंधन बंद केले नव्हते. यामुळे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ एकाच वेळी कसे झाले असा प्रश्न उपस्थित होतो. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.