भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना जीवे मारण्याची धमकी (फोटो- ani)
नवी दिल्ली: लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक, 2025 हे सादर करण्यात आले होते. या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी राज्यसभेतही हे वक्फ विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली. दरम्यान आता यावरूनच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री शाहनवाज हुसेन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थ दिल्याप्रकरणी शाहनवाज हुसेन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
वक्फ सुधारणा विधेयक ही मुस्लिम समाजाच्या हिताचे असल्याचे शाहनवाज हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मला सोशल मिडियावर सारख्या धमक्या मिळत आहेत. मात्र मी घाबरणार नाही. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था माझ्यासोबत आहे. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे. विरोधक विनाकारण भ्रम पसरवत आहेत. याआधी देखील शाहीन बाग सारख्या ठिकाणी आंदोलन केले गेले. ती विरोधकांची राजनीती होती.
शाहनवाज हुसेन म्हणाले, मोबाइल, सोशल मिडियावर एकसारख्या जीवे मारण्याच्या धमक्या प्राप्त होत आहेत. मात्र मी घाबरणार नाही. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मुस्लिम समाजाला घाबरण्याची गरज नसल्याचे शाहनवाज हुसेन म्हणाले आहेत. येणारया बिहार विधानसभा निवडणुकीत देखील एनडीएला मोठे यश मिळेल. मुस्लिम समाज देखील भाजपव एनडीएच्या मागे उभा राहील असा विश्वास हुसेन यांनी व्यक्त केला.