Photo Credit- Social Media '...तर मी निवडणूक लढवणार नाही'; विधानसभेपूर्वी केजरीवालांनी खेळी केली
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असून येत्या 5 फेब्रुवारीला दिल्लीत मतदान प्रक्रिया होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक यांच्या अरविंद केजरीवाल यांनी चौथ्यांदा दिल्लीवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यभरात आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असताना केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना आव्हान देत शड्डू ठोकले आहेत.
दिल्लीतील शकूर बस्ती भागात एका निवडणूक सभेदरम्यान केजरीवाल यांनी अमित शाहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ” निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे भाजपचे झोपडपट्टीवासीयांवरील प्रेम वाढत चालले आहे. पण भाजपला झोपडपट्टीवासीयांवर प्रेम नाही तर त्यांची मते आणि जमिनींवर प्रेम आहे.
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताला आमंत्रण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राहणार उपस्थित
गेल्या १० वर्षात झोपडपट्टीवासीयांवर दाखल केलेले सर्व खटले 24 तासांच्या आत मागे घेतले जावेत. त्यांना त्याच ठिकाणी स्थायिक केले जाईल, त्यांना त्यांची घरे सोडण्यासाठी भाग पाडले जाणार नाही, असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र द्या आणि त्यांना विश्वास द्या. जर तुम्ही असे केले तर केजरीवाल निवडणूक लढवणार नाही. असे खुले आव्हान केजरीवाल यांनी अमित शाहांना दिले आहे. काल अमित शहाजींनी झोपडपट्टीवासीयांना बोलावून मला शिवीगाळ केली होती. गृहमंत्र्यांना प्रतिष्ठा असली पाहिजे. शब्दांना प्रतिष्ठा असली पाहिजे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
केजरीवाल म्हणाले की, ज्या प्रकारे अमित शाहांनी खोटं बोलून झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही फक्त हे उघड करण्यासाठी आलो आहोत. अमित शहाजी म्हणाले होते की ‘जिथे झोपडपट्टी असते तिथे घर असते’ पण ते हे सांगत नाहीत की जिथे झोपडपट्टी असते तिथेच त्यांना त्यांच्या मित्रांची आणि बांधकाम व्यावसायिकांचीही घरे बनवायची असतात. त्यांचा मित्र कोण आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांना ही जमीन त्यांच्या मित्रांना द्यायची आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्याध्यापकाने दहावीच्या ८० मुलींना काढायला लावले शर्ट ; ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
ते म्हणत आहेत की मोदी त्यांच्यासाठी घरे बांधतील, पण 10 वर्षांत 4 लाख झोपडपट्टीवासीयांसाठी फक्त4700 घरे बांधली गेली आहेत. या दराने एक हजार वर्षे लागतील. या झोपडपट्टीतील लोकांना हे माहित नाही की 30 सप्टेंबर 2024 रोजी रेल्वेने या जमिनीची निविदा काढली आहे. कोणीतरी ते कागदपत्रे सत्येंद्र जैन यांना दिली. 27 डिसेंबर रोजी एलजीने या जमिनीचा वापर बदलला. पण निवडणुका झाल्यानंतर हेच लोक 8 फेब्रुवारीला येऊन या झोपडपट्ट्या पाडतील, असाही दावा केजरीवाल यांनी यावेळी केला.
अमित शाह जी को मेरा चैलेंज। pic.twitter.com/w3GnkXWlc1
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 12, 2025
2015 मध्येही झोपडपट्ट्या पाडल्या जाणार होत्या. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी रात्री येऊन त्या पाडण्यापासून वाचवल्या. नाहीतर त्या तेव्हाच तोडल्या असत्या. त्यावेळी एका मुलीलाही आपला जीव गमवावा लागला. त्यांना झोपडपट्टीतील लोकांवर नाही तर त्यांच्या जमीनी पाहिजेत. जर दिल्लीतील लोकांनी भाजपला मतदान केले तर ते एका वर्षात सर्व झोपडपट्ट्या पाडतील. तुम्हाला मारून टाकतील. गेल्या १० वर्षात भाजपच्या लोकांनी झोपडपट्ट्या पाडून तीन लाख लोकांना बेघर केले आहे,असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आजदेखील दक्षिण कोरियातील विमान अपघात गूढच बनून राहिले