आजदेखील दक्षिण कोरियातील विमान अपघात गूढच बनून राहिले; शेवटच्या 4 मिनिटांचे रेकॉर्डिंग ब्लॅक बॉक्समधून गायब ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
सोल : दक्षिण कोरियातील विमान अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे. रेकॉर्डिंगची शेवटची 4 मिनिटे ब्लॅक बॉक्समधून गायब आहेत. तेथील वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे की विमानात बसवलेले कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरने विमान अपघाताच्या चार मिनिटे आधी काम करणे बंद केले होते. रेकॉर्डिंगची शेवटची 4 मिनिटे ब्लॅक बॉक्समधून गायब आहेत.
29 डिसेंबर 2024 ही तारीख दक्षिण कोरियासाठी खूप भयावह आहे. या दिवशी जेजू एअरलाइन्सच्या विमानाचा मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. या विमानात 181 लोक होते. या दुर्घटनेत दोन वगळता सर्व 179 जणांचा मृत्यू झाला. आता या अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे. दक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, अपघाताच्या चार मिनिटे आधी विमानाच्या ब्लॅक बॉक्सने काम करणे बंद केले होते. म्हणजे शेवटच्या चार मिनिटांचे रेकॉर्डिंग ब्लॅक बॉक्समधून गायब आहे.
शेवटच्या 4 मिनिटांचे रेकॉर्डिंग गहाळ आहे
परिवहन मंत्रालयाने सांगितले की जेजू एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 विमानात बसवलेले कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) विमान अपघाताच्या चार मिनिटे आधी काम करणे थांबले होते, म्हणजेच त्याचे रेकॉर्डिंग थांबले होते. मात्र हे उपकरण का बंद करण्यात आले हा तपासाचा विषय आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, विमान अपघाताच्या तपासासाठी सीव्हीआर आणि एफडीआर डेटा महत्त्वाचा आहे परंतु अपघाताचा तपास विविध डेटाच्या तपासणी आणि विश्लेषणाद्वारे केला जातो, त्यामुळे आम्ही अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काबासमोर 200 दहशतवादी, 1 लाख मुस्लिम कैद… मक्कातील ‘ती’ घटना, जेव्हा जग हादरले होते
अपघाताच्या तपासाला काही महिने लागू शकतात
दक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाने पुढे सांगितले की, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे प्रथम स्थानिक पातळीवर विश्लेषण करण्यात आले आणि नंतर ते अमेरिकेला उलट तपासणीसाठी पाठवले गेले. फ्लाइट डेटा रेकॉर्डर पूर्णपणे खराब झाला होता आणि त्याचा कनेक्टर देखील गायब होता. एफडीआर विश्लेषणासाठी अमेरिकेलाही पाठवण्यात आले आहे. अमेरिकेचे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड याचे विश्लेषण करेल. विमान अपघाताचे कारण काय होते हे अद्याप समजू शकलेले नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. त्याच्या तपासाला काही महिने लागू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळमध्ये रामलल्लाच्या सासरी पहिला वर्धापन दिन करण्यात आला साजरा; 1.25 लाख दिव्यांनी उजळली जनकपुरी
जेजूच्या विमानाला अपघात कसा झाला?
वास्तविक, जेजू एअरलाइन्सचे हे विमान 181 लोकांसह बँकॉकहून दक्षिण कोरियाला येत होते. मुआन विमानतळावर उतरल्यानंतर विमानाने धावपट्टीवर काही सेकंदांचे अंतर कापले आणि त्यानंतर ते धावपट्टीवरून घसरले आणि विमानतळाच्या सीमा भिंतीला धडकले. यानंतर विमानात भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच विमानतळावर एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ पोहोचले.