मतदानाआधी 'आप'ला झटका! दिल्लीच्या CM आतिशींच्या PA ला मोठ्या रकमेसह अटक, केजरीवालांविरोधातही FIR
दिल्ली विधानसभा निडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. त्याआधी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांचे पीए पंकज यांना गिरीखंडनगरमध्ये १५ लाख रुपयांच्या रकमेसह अटक करण्यात आली आहे. तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांनी हरियाणा सरकारवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात शहााबाद येथील रहिवासी जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘यमुनेच्या पाण्यात विष’ या विधानावर निवडणूक आयोगाने त्यांना पुरावे देण्याचे निर्देशही दिले होते. भाजपसोबतच काँग्रेसनेही आरोप केला आहे की केजरीवाल यांनी कोणत्याही पुराव्यांशिवाय गंभीर आणि चिथावणीखोर विधान केलं आहे, ज्यामुळे जनतेत भीती आणि तणाव निर्माण होऊ शकतो. यावर निवडणूक आयोगाने २९ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले होते.
केजरीवाल यांनी हरियाणा सरकारवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. शहााबाद येथील रहिवासी जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून, केजरीवाल यांच्याविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम १९२, १९६(१), १९७(१), २४८(अ) आणि २९९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.
जगमोहन मंचंदा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या विधानाने हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, दोन्ही राज्यातील लोक भडकले आहेत. केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील लोकांना हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पिण्याचे पाणी मिळते. यमुनेमार्गे हरियाणाला पिण्याचे पाणी येते. हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेतून येणाऱ्या पाण्यात विष मिसळून ते दिल्लीला पाठवले आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
तक्रारीतील केजरीवाल यांच्या विधानाचा हवाला देत ते पुढे म्हणाले, आमच्या दिल्ली जल बोर्डाच्या अभियंत्याने ते पकडले हे चांगले आहे. त्यांनी ते पाणी दिल्ली सीमेवर थांबवले आणि दिल्लीत येऊ दिले नाही. जर ते पाणी दिल्लीत शिरले असते आणि पिण्याच्या पाण्यात मिसळले असते तर दिल्लीत किती लोकांचा मृत्यू झाला असता कोणास ठाऊक? हरियाणाच्या भाजप सरकारने दिल्लीला पाठवलेले हे पाणी दिल्लीत पोहोचले असते तर मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला असता.
यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना आरोपांवरील पुरावे देण्याचे निर्देशही दिले होते. भाजपसोबतच काँग्रेसनेही आरोप केला आहे की केजरीवाल यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय गंभीर आणि चिथावणीखोर विधान केले आहे, ज्यामुळे जनतेत भीती आणि तणाव निर्माण होऊ शकतो. यावर निवडणूक आयोगाने २९ जानेवारीपर्यंत उत्तर मागितले होते.
दिल्ली निवडणुकीदरम्यान, यमुनेच्या पाण्याचा वाद देशाच्या राजधानीपासून हरियाणापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे. अलिकडेच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, केजरीवाल इतर खोटे प्रचार पसरवून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री सैनी यांनी भाजप उमेदवार मनोज शौकीन यांच्या समर्थनार्थ नांगलोई येथे झालेल्या जाहीर सभेत केला होता.