जगभरातील टाळेबंदीच्या बातम्या येत असताना नुकतचं डेल (Dell) या दिग्गज कंपनीनं कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला असताना आता पुन्हा एका मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. Yahoo कंपनी 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढण्याच्या विचाराता आहे. याचा परिणाम 1,600 हून अधिक लोकांवर होणार आहे.
[read_also content=”मोदी सरकार ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडतेय, तर दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदानींना मिठी मारून बसलेय; सामनातून केंद्र सरकारवर निशाणा https://www.navarashtra.com/maharashtra/the-modi-government-is-giving-orders-to-hug-the-cow-while-on-the-other-hand-the-big-bull-himself-is-hugging-adani-aiming-at-the-central-government-from-saamana-368634.html”]
आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरकपातीचे गंडांतर सध्या सुरु असून आता त्यात अजून एका दिग्गज आयटी कंपनीची भर पडली आहे.[blurb content=””] कंपनी कर्माचाऱ्यांना नारळ देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते. कंपनी त्याच्या जाहिरात तंत्रज्ञान युनिटच्या मोठ्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून याची योजना करत आहे. कंपनी या युनिटमधून तिच्या एकूण कर्मचार्यांपैकी 20% पेक्षा जास्त बाहेर पडू शकतात. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या 50% पेक्षा जास्त अॅड टेक कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. याचा परिणाम 1,600 हून अधिक लोकांवर होणार आहे. यापूर्वी गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते की, कंपनीतील १२ टक्के म्हणजेच एक हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजेच ६०० लोकांना कामावरून काढून टाकेल. एका मुलाखतीत, Yahoo चे CEO म्हणाले की, नोकरीवरून काढण्याचा निर्णय हा आर्थिक मुद्द्यांमुळे झालेला नाही.