बी.टेक, एके ४७ अन् ४ राज्यामध्ये दरारा; नक्की कोण होता १.५ कोटींचं बक्षीस असलेला ७० वर्षांचा नक्षलवादी?
छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान याच चकमकीत नवबल्ला केशव राव उर्फ बसवराजू हा ७० वर्षांचा नक्षलवादी ठार झाला आहे. नक्षलवादी संघटनेचा तो सरचिटणीस होता. सरकारने त्याच्यावर १.५ कोटींच बक्षीस लावलं होतं. मात्र त्यांचं शिक्षण आणि दरारा धक्क करणारा आहे.
बसवराजूने २४ वर्षे पॉलिटब्युरोचा सदस्य म्हणून काम सुरू ठेवले. त्यांने पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रभारी म्हणूनही काम केलं. तसंच वारंगल येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं. रीजनल इंजिनिअरिंग कॉलेज वारंगल येथून बी.टेक केलं. असंही सांगितलं जातं की त्याने १९७० मध्येच घर सोडलं होतं. दरम्यान बसवराजूंना युद्धाची कला अवगत होती. बसवराजू सैन्याची कमान सांभाळण्यासाठी आणि आक्रमक हल्ले करण्यासाठी ओळखले जात होते. ते हल्ल्यांचे नियोजन करण्यातही तज्ज्ञ होते. त्यांना नवबल्ला केशव राव गंगण्णा, विजय, दर्पू नरसिंह रेड्डी, नरसिंह, प्रकाश, कृष्णा इत्यादी नावांनी देखील ओळखले जात होतं.
बसवराजू गेल्या ३५ वर्षांपासून माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. सरकारने त्यांच्यावर सुमारे दीड कोटी रुपयांचे बक्षीस लावलं होतं होते. बसवराजू श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियानापेटा गावातील रहिवासी होता. तो ७० वर्षांचा होता. बसवराजू नोव्हेंबर २०१८ पासून सीपीआय माओवादी संघटनेच्या सरचिटणीस पदावर कार्यरत होता. त्यांच्याकडे एके ४७ रायफल होती आणि तो छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात सक्रिय होता.