आता जगन्नाथ पुरीच्या मंदिरात लवकरच नवीन ड्रेस कोड लागू होणार, फाटक्या जीन्स आणि स्कर्ट घालून भक्तांना जाता येणार नाही!

आता लवकरच नवीन ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात भाविकांना फाटलेली जीन्स आणि स्कर्ट घालता येणार नाही.

    पुरी : आता यापुढे भाविकांना ओडीसामधील (Odisha) प्रसिद्ध जगन्नाथ पुरीच्या मंदिरात (Jagganath Temple)जातान पोशाखाकडे विषेश लक्ष द्याव लागणार आहे. जगन्नाथ मंदिरात आता भाविकांना विशेष ड्रेस कोड (dress code) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता तुम्हाला मंदिरात शार्ट्स, फाटलेली जीन्स, स्कर्ट घालता येणार नाही. जगन्नाथ मंदिराच्या प्रशासनानुसार देशातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू आहे. अशा परिस्थितीत १ जानेवारीपासून मंदिरात हा ड्रेस कोड लागू होणार आहे.

    आता मंदिर उघडताच भाविकांना ‘सभ्य कपडे’ घालण्यास सांगण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या संदर्भात पोलीस आणि जगन्नाथ प्रशासनाचे स्वयंसेवक भाविकांवर कडक नजर ठेवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आता फाटलेल्या जीन्स, स्लीव्हलेस कपडे आणि हाफ पँट घालून कोणताही भाविक ओडिशातील पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात प्रवेश करू शकणार नाही.

    १ जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’ लागू

    १२ व्या शतकातील या मंदिरातील भाविकांसाठी १ जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’ लागू १ जानेवारीपासून ‘ड्रेस कोड सुरु होईल. याबाबत मंदिर प्रशासनाने म्हटले आहे की, मंदिर हे समुद्रकिनारा किंवा उद्यान नाही, मंदिरात देव राहतो, ते मनोरंजनाचे ठिकाण नाही. मंदिरात आता नवीन ड्रेस कोड लागू होणार आहे या संदर्भात श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे प्रमुख रंजन कुमार दास म्हणाले, “मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे. पण तरीही काही लोक इतर लोकांच्या धार्मिक भावनांची पर्वा न करता मंदिरात येतात. इथे मंदिरात काही लोक फाटक्या जीन्स, स्लीव्हलेस कपडे आणि हाफ पॅन्ट घालून समुद्रकिनारी किंवा उद्यानात फिरत असल्यासारखे दिसले. पण मंदिरात देव राहतो हे लक्षात ठेवावे लागेल, मंदिर हे मनोरंजनाचे ठिकाण नाही.

    दास यांच्या म्हणण्यानुसार, मंदिराला भेट देण्यासाठी स्वीकारार्ह पोशाखाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मंदिर प्रशासनाने ड्रेसकोड लागू करण्याची जबाबदारी आता मंदिराच्या सिंह द्वार येथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचारी आणि मंदिरातील प्रतिहारी सेवकांना दिली आहे.