नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई ; एजेएल आणि यंग इंडियनची 750 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त

ईडीने सांगितले की त्यांनी काँग्रेसशी संलग्न एजेएल आणि यंग इंडियन यांची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये एजेएलची मालमत्ता ६६१.६९ कोटी रुपयांची आहे.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणात, ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेसशी संलग्न एजेएल आणि यंग इंडियन यांची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एजेएलची दिल्ली, मुंबई आणि लखनऊसह अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. त्याची एकूण किंमत 661.69 कोटी रुपये आहे.
    ईडीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून म्हटले की, यंग इंडियनच्या मालमत्तेची किंमत 90.21 कोटी रुपये आहे. याबाबत काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे केले जात असल्याचे सांगितले. वास्तविक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची कंपनीत हिस्सेदारी आहे.
    काँग्रेस काय म्हणाली?
    ईडीच्या या कारवाईवर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंधवी म्हणाले, “ईडीच्या एजेएल मालमत्ता जप्त केल्याच्या बातम्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांतील निश्चित पराभवावरून लक्ष हटवण्याची त्यांची हतबलता दर्शविते.” ते पुढे म्हणाले की, भाजपची आघाडी, मित्रपक्ष, सीबीआय, ईडी किंवा आयटी त्यांचा (भाजप) निवडणुकीत पराभव रोखू शकत नाहीत.
    मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. राजस्थान आणि तेलंगणामध्ये निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांतील निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत.