Photo Credit- Social Media छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचा छापा
छत्तीसगड: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेश बघेल यांच्या घरावर सकाळी ईडीने छापा टाकला. कथित दारू घोटाळा, कोळसा कर आणि महादेव सट्टा अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ईडीच्या पथकाने छत्तीसगडमधील १४ ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये भिलाई येथील बघेल यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. याशिवाय भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्या संशयित ठिकाणीही छापे टाकण्यात आले आहेत.
चार वाहनांमधून आलेल्या ईडीच्या पथकाने घरातील कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाच्या दस्तऐवजांची तपासणी केली. छाप्यादरम्यान घराबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. भूपेश बघेल यांच्या निवासस्थानासोबतच भिलाईतील नेहरूनगर येथील मनोज राजपूत, चारोडा येथील अभिषेक ठाकूर आणि संदीप सिंग, दुर्ग येथील कमल अग्रवाल यांच्या किशोर राईस मिल, सुनील अग्रवाल यांच्या सहेली ज्वेलर्स आणि बिल्डर अजय चौहान यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली.
ईडीच्या कारवाईनंतर भूपेश बघेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “सात वर्षांपासून सुरू असलेला खोटा खटला न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता ईडीच्या पथकाने माझ्या घरावर छापा टाकला आहे.”तसेच, “जर कोणी या कटाद्वारे पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो मोठा गैरसमज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची कारवाई आणि काँग्रेसचा विरोध यामुळे छत्तीसगडमधील राजकीय वातावरण तापले आहे. भूपेश बघेल यांना या छाप्यांमुळे अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे का? आणि याचा काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीवर काय परिणाम होईल? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात २००० कोटींपेक्षा जास्त रकमेचा दारू घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. या घोटाळ्यात आयएएस अधिकारी अनिल तुतेजा, उत्पादन शुल्क विभागाचे एमडी एपी त्रिपाठी आणि उद्योगपती अन्वर ढेबर यांचा समावेश असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
Oscar नाही पण IIFA २०२५ मध्ये Laapataa Ladies ने मिळवले स्थान, जाणून घ्या कोणत्या चित्रपटाला मिळाले
ईडीच्या तपासानुसार, दारू घोटाळा तीन वेगवेगळ्या मार्गांनी करण्यात आला:
1. डिस्टिलरी चालकांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन वसूल
2. सरकारी दुकानांतून बनावट होलोग्राम असलेली दारू विक्री
3. डिस्टिलरींच्या पुरवठा क्षेत्रात फेरफार करून बेकायदेशीर वसुली