श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farukh Abudullah) यांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे (National Conference) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना फारुख अब्दुल्ला यांनी ही घोषणा केली आहे. ५ डिसेंबरला पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.
फारुख अब्दुल्ला यांनी प्रकृतीच्या कारणास्तव (Health Reasons) पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, माझी प्रकृती आता पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मला साथ देत नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद सोडत आहे.
फारुख अब्दुल्ला यांच्या निर्णयामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ५ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांच्याकडेच ही जबाबदारी जाण्याची शक्यता आहे.