Photo Credit- Social Media
नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी (30 नोव्हेंबर) संध्याकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलाश परिसरात पुन्हा एकदा हल्ला झाला. पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर एक द्रव पदार्थ फेकला. त्याचवेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा पथकाने त्याला तत्काळ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पण या घटनेनंतर राजधानीत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दिल्लीत होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्यावरच्या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप आप’च्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राहिली की नाही, असा प्रश्न उपस्थित करत आपने गृहमंत्री अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी ट्विटरवर भाजपवरनिशाणा साधला आहे. “आज भरदिवसा एका भाजप कार्यकर्त्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. दिल्ली निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव झाल्याची निराशा भाजपमध्ये दिसून येत आहे.पण दिल्लीतील जनता भाजपच्या या घाणेरड्या कृत्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, गेल्या वेळी आठ जागा होत्या, यावेळी दिल्लीतील जनता भाजपला शून्य जागा देईल.
सकाळ होईल खास! घरी बनवा हटके अन् टेस्टी ‘पोटॅटो लिफाफा’, नोट करा रेसिपी
या घटनेनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या पॉश भागात असलेल्या पंचशीलमध्ये एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती, आज आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंब शोकाकुल आहे. दिल्लीत आजकाल ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, समाजातील प्रत्येक घटकातील लोक गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. गृहमंत्री अमित शहा यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
गेल्या 35 मधील हा तिसरा हल्ला असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबरला विकासपुरी, 27 नोव्हेंबरला नांगलोई आणि आज 30 नोव्हेंबरला ग्रेटर कैलासमध्ये हल्ला झाला होता. भाजपला केजरीवालांना मारायचे आहे का? हल्लेखोरांवर कारवाई का होत नाही? असाही हल्लाबोल आपकडून करण्यात आला आहे.
NZ vs ENG : इंग्लंडच्या विजयानंतर WTC गुणतालिकेत बदल, कोण आहेत फायनलमध्ये
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या रोज प्रवास करत आहेत. आज ते ग्रेटर कैलासमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते. पण त्याच ठिकाणी त्यांच्यावर असा हल्ला झाला. या हल्ल्यामागे ‘आप’ने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप अपयशी ठरली. या हल्ल्या गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश उघड झाले आहे.
तर हे अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च हा हल्ला घडवून आणला आहे. पराभव होणार असल्याने ‘आप’ अशी कृत्ये करत आहे. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही अशा कोणत्याही हल्ल्यांचे समर्थन करत नाही. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर काढावे, असे आमचे आवाहन असल्याचे म्हटले आहे.