गुजरातच्या मोरबीमध्ये निर्माणाधीन कॅालेजचा स्लॅब कोसळल्याची घटना शनिवारी सकाळीच उघडकीस आली. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशमधून देखील मोठी बातमी समोर येत आहे. भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग (Bhopal Mantralaya Bulding Fire) लागली आहे. चौथ्या मजल्यावर आग लागली. आग लागताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. सध्याअग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आलं असून अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत.
[read_also content=”गुजरातच्या मोरबीत मोठी दुर्घटना! निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी! https://www.navarashtra.com/india/4-injured-after-medical-college-slab-collapsed-in-gujrat-morabi-nrps-513813.html”]
आज सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळातच या प्रकरणाची माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ही आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आग एवढी भीषण होती की, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लोकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, वल्लभ भवनच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. खासदारांचे सचिवालय वल्लभ भवनमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय येथे पाचव्या मजल्यावर आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये भोपाळमधील सातपुडा भवनात भीषण आग लागली होती ज्यात अनेक महत्त्वाच्या सरकारी फायली जळून खाक झाल्या होत्या.
#WATCH | Madhya Pradesh | A massive fire breaks out at Vallabh Bhavan State Secretariat in Bhopal. Firefighting operations are underway. Details awaited. pic.twitter.com/QBto0QSVIy
— ANI (@ANI) March 9, 2024