उत्तर प्रदेशमध्ये भीषण स्फोट (फोटो- सोशल मिडिया)
लखनौ: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. अमरोहा जिल्ह्यातील अतरासी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या गावात अवैधरीत्या फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यात मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. काम सुरू असताना अचानक या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.
या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असल्याने संपूर्ण फॅक्टरीच उद्ध्वस्त झाली आहे. या भीषण स्फोटामध्ये 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 6 पेक्षा जास्त कामगार हे जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटात संपूर्ण करखानाच उद्ध्वस्त झाला आहे. या ढीगाऱ्याखाली 12 पेक्षा जास्त कामगार अडकल्याचे समजते आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिस प्रशासन तातडीने दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. हा कारखाना गावाच्या बाजूला असणाऱ्या जंगलात सुरू होती असे सांगितले जात आहे. हा स्फोट खूप भीषण होता असे काही स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचे समजते आहे.
घटनेची चौकशी होणार
अतरासी गावात असणाऱ्या कारखान्यात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आहे. यात 6 मंजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 6 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. 12 पेक्षा अधिक कामगार ढीगऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान हा कारखाना अवैधरित्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ही घटना कशामुळे घडली आणि त्यामागचे कारण काय याचा तपास केला जाणार आहे.
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कोटावुरुतला भागात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला. पोलीस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी घटनेला दुजोरा दिला असून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं.
Firecracker Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा मृत्यू
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्याशी फोनवरून संपर्क करून घटनेचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे आणि शोकग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.