दिल्लीतील गुरुग्राममध्ये परदेशी पाहुण्यांनी कचरा साफ केला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Foreigner cleaned gurugram : नवी दिल्ली : भारताची संस्कृती पाहण्यासाठी परदेशी पाहुणे देशामध्ये येत असतात. विविधतेने नटलेले भारतीय सौंदर्य हे पर्यटकांना आकर्षित करते. मात्र सध्या आपली नाचक्की होईल अशा पद्धतीची व्हिडिओ समोर आली आहे. परदेशी पाहुणे चक्क रस्ता साफ करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटसचा वर्षाव केला आहे.
दिल्लीला लागून असलेल्या सायबर सिटी गुरुग्राममध्ये कचरा आणि पाणी साचले होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आणि राडारोडा साचलेला दिसून आला. महापालिकेचे दुर्लक्ष पाहून आता परदेशी लोकांनी रस्ते स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. गुरु द्रोणाचार्य मेट्रो स्टेशनजवळील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी अवघ्या १५ दिवसांत एक गट तयार केला आणि गुरुग्राममधील त्यांच्या परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी त्यांच्या हातात घेतली आणि स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले. या गटात परदेशी लोकांचाही समावेश आहे, ज्यांनी गुरु द्रोणाचार्य मेट्रो स्टेशनजवळ स्वच्छता मोहीम राबवली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परदेशी पाहुण्यांनी गुरुग्राममधील रस्त्यांवरील कचरा साफ
या गटातील लोकांनी रस्त्यावर पसरलेला कचराच साफ आहे. त्याचबरोबर नाल्याचा मुख्य दरवाजा उघडला आणि त्यात दिसणारा कचराही साफ केला. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारे अमन गुप्ता म्हणाले, “हा गट केवळ १५ दिवसांपूर्वी एक्सद्वारे तयार करण्यात आला आहे. आपले शहर स्वच्छ करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने पुढे येऊन आपले शहर स्वच्छ केले पाहिजे, तरच आपण गुरुग्रामला स्वच्छ शहर म्हणून ओळख मिळवू शकतो.” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परदेशी पाहुण्यांचे भारतीयांना आवाहन?
युरोपहून आलेले लज्जर म्हणाले, “गुरुग्राम हे एक अद्भुत ठिकाण आहे. येथे पसरलेली घाण साफ करण्यासाठी दुसरे कोणीही येणार नाही. जर प्रत्येकाने आपले घर आणि दुकान दोन मीटरपर्यंत स्वच्छ ठेवले तर गुरुग्राम स्वच्छ होईल. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि गुडगावच्या नागरिकांना त्यांची जबाबदारी समजून गुडगाव स्वच्छ ठेवण्यात आपली भूमिका बजावण्याचे आवाहनही केले आहे.”
स्वच्छता मोहीम राबवून महानगरपालिकेचा पर्दाफाश
गुरुग्रामची स्थिती पाहून, महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले नसले तरी, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आणि परदेशी लोकांनी मेट्रो स्टेशनजवळ स्वच्छता मोहीम राबवून महानगरपालिकेकडून कागदावर चालवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा पर्दाफाश केला आहे, परंतु त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की ते स्वच्छता ही त्यांची जबाबदारी मानतात आणि गुरुग्रामला प्रत्यक्षात मिलेनियम सिटीचा दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
कॉंग्रेस पक्षाकडून यावरुन सत्ताधाऱ्यांना जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. कॉंग्रेसने लिहिले आहे की, “परदेशी पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात… पण इथली अस्वच्छता बघून त्यांनाच साफसफाई करू वाटली हाच मोदी सरकारचा खरा नाकर्तेपणा! आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की करणाऱ्या आणि जनतेच्या मूलभूत गरजा बाजूला ठेवून फक्त दिखावा करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध,” अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.
परदेशी पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात… पण इथली अस्वच्छता बघून त्यांनाच साफसफाई करू वाटली हाच मोदी सरकारचा खरा नाकर्तेपणा!
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की करणाऱ्या आणि जनतेच्या मूलभूत गरजा बाजूला ठेवून फक्त दिखावा करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध.
.
.
.#CleanIndiaOrShame… pic.twitter.com/UR0GNTgsSG— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 26, 2025