संग्रहित फोटो
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक ८ व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महागाईमुळे पगारवाढीची मागणी वाढत आहे. 7 व्या वेतन आयोगाला जानेवारी 2026 मध्ये 10 वर्षे पूर्ण होतील, त्यामुळे नवीन वेतन आयोगाची गरज भासू लागली आहे. जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर किमान मूळ वेतन 18,000 वरून 34,500 पर्यंत वाढू शकते. येत्या वर्षभरात केंद्र सरकार ८ वा वेतन आयोग लागू करु शकेल, अशी अपेक्षा आहे.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
सरकार सहसा दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग बनवते. मागील एक, म्हणजे 7 वा वेतन आयोग, 2014 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याच्या शिफारशी जानेवारी 2016 पासून लागू झाल्या. हा पॅटर्न पाहता 2025 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन होण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्याचा प्रभाव 2026 पासून दिसू लागेल. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एका कर्मचारी संघटनेच्या नेत्याने माहिती दिली की, याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी या विषयावर कॅबिनेट सचिवांशी चर्चा केली.
पगारात किती वाढ अपेक्षित आहे?
7 व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 23% वाढ झाली होती, तर 6 व्या वेतन आयोगात ही वाढ थोडी जास्त होती. अशी चर्चा सुरु आहे की, 8 व्या वेतन आयोगानंतर, किमान मूळ वेतन 18,000 वरून 34,500 पर्यंत वाढू शकते. याची अंमलबजावणी झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकेल.
हे सुद्धा वाचा : शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल; बापूसाहेब पठारे यांचा टिंगरेंवर हल्लाबोल
8 व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा
कर्मचाऱ्यांना आशा आहे की नवीन वेतन आयोगामुळे त्यांना केवळ मूळ पगारात वाढच मिळणार नाही, तर भत्त्यांमध्येही सुधारणा होईल.
हे सुद्धा वाचा : पुण्यात अवैध धंदे सुरुचं; धनकवडीत जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्धवस्थ
अनेक दिवसांपासून होतीये मागणी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ८ वा वेतन आयोग लागू करण्याची मागील केली जात आहे. गेल्या काही महिन्याखाली रेल्वे कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी ८ व्या वेतन आयोगाच्या मागणीबाबत कॅबिनेट सचिवांना पत्रही लिहिले आहे. याशिवाय अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे वारंवार ८ व्या वेतन आयोगाची मागणी लावून धरली आहे.