दीड वर्षापासून बनावट टोलनाक्याच्या माध्यमातून केली जात होती फसवणूक; टोलचे पैसे घेतले जायचे पण…

विचार करा. तुम्ही हायवेने गाडी चालवत आहात. वाटेत तुम्हाला एक टोलनाका लागला. तुम्ही तो टोल भरला. मात्र, काही काळानंतर तुम्हाला कळलं की तो टोलनाकाच खोटा होता ! धक्का बसला ना? असाच धक्का गुजरातमधील हायवेवर गाडी चालवणाऱ्यांना बसला आहे. ही काही चित्रपटाची कथा नाही, तर गुजरातमध्ये अशा प्रकारची घटना प्रत्यक्षात घडली आहे.

    गांधीनगर : विचार करा. तुम्ही हायवेने गाडी चालवत आहात. वाटेत तुम्हाला एक टोलनाका लागला. तुम्ही तो टोल भरला. मात्र, काही काळानंतर तुम्हाला कळलं की तो टोलनाकाच खोटा होता ! धक्का बसला ना? असाच धक्का गुजरातमधील हायवेवर गाडी चालवणाऱ्यांना बसला आहे. ही काही चित्रपटाची कथा नाही, तर गुजरातमध्ये अशा प्रकारची घटना प्रत्यक्षात घडली आहे. पंतप्रधानांच्या राज्यातच ही घटना घडल्याने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    कच्छ राष्ट्रीय महामार्गावर उघडकीस आले. येथील मोरबीजवळ राष्ट्रीय महामार्गाला बायपास करून खासगी जमिनीवर एक खोटा टोल नाका उभारण्यात आला. लोकांना या टोलनाक्याकडे वळवण्यासाठी तेथे निर्धारित रकमेपेक्षा अर्धी रक्कम आकारण्यात येत होती. अशाप्रकारे येथे एका वर्षाहून अधिक काळ सरकारी अधिकारी आणि ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात आली.

    ज्या जमिनीवर हा टोल नाका उभारण्यात आला, ती जमीन व्हाईट हाऊस सिरेमिक कंपनीच्या मालकीची आहे. बामणबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर अधिकृत वघासिया टोल प्लाझा आहे. या टोल प्लाझाच्या वास्तविक मार्गावरून काही वाहने वळवली जात होती. टोलच्या निम्म्या किंमतीचे प्रलोभन दाखवून ट्रकचालक या मार्गाकडे वळत होते.