झाडग्राम येथे पीएम नरेंद्र मोदी यांनी रस्त्याच्या दुकानावरुन झालमुरी खाल्ली (फोटो - एक्स)
पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोदी हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांना विकासाची आश्वासने दिले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानामध्ये झालमुरी खाण्याची इच्छा पंतप्रधानांना रोखता आली नाही. त्यांनी दुकानामध्ये जाऊन झालमुरी खाल्ली. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. भाजप समर्थक याला पंतप्रधानांच्या साधेपणाचे लक्षण म्हणत आहेत, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने याबाबत एक अत्यंत गंभीर आणि तीव्र आरोप केला आहे. टीएमसीचा आरोप आहे की, पंतप्रधानांच्या या उपस्थितीमुळे हेमंत सोरेन यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही आणि त्यांना परतावे लागले.
ঝাড়গ্রামে ঝালমুড়ি খাবার বিরতি! pic.twitter.com/t0TcDeONxt — Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026
हे देखील वाचा : PM मोंदींना झालंय तरी काय? तमिळनाडूच्या सभेत दिसला डार्क स्कीनटोन; Viral Video, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
पंतप्रधान मोदींच्या चवीने टीएमसीची चव बिघडवली
रविवारी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधानांचा ताफा कॉलेज मोअरजवळ अचानक थांबल्याने झाडग्राममधील वातावरण पूर्णपणे बदलले. पंतप्रधान मोदी झालमुरी खाण्यासाठी एका स्थानिक दुकानात थांबले. पंतप्रधानांनी स्वतः या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचे कौतुक केले. पण जेव्हा विरोधी पक्षाने यात प्रवेश केला, तेव्हा या छोट्याशा विश्रांतीचे रूपांतर एका मोठ्या राजकीय वादात झाले.
हे देखील वाचा : 44 अंशाच्या तापत्या उन्हात 15 राज्यात पडणार ‘तुफानी’ पाऊस, देशाच्या वातावरण असंतुलित
हेमंत सोरेन यांना रांचीला परत का यावे लागले?
तृणमूल काँग्रेसचा दावा आहे की, पंतप्रधानांच्या अचानक झालेल्या या कृतीमुळे संपूर्ण परिसरात मोठे सुरक्षा बदल करण्यात आले. पक्षाचा आरोप आहे की, पंतप्रधानांच्या झालमुरी भोजनाच्या वेळी, सुरक्षा नियमांचे कारण देत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला झाडग्राममध्ये उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली.
Narendra Modi’s Adivasi-Birodhi mindset has been exposed for all to see. Because the “Pradhan Sevak” decided to extend his stay in Jhargram to eat Jhalmuri, Jharkhand Chief Minister Shri Hemant Soren and his wife and MLA Smt. Kalpana Soren were denied permission to fly their… pic.twitter.com/xK3WAUPjqO — All India Trinamool Congress (@AITCofficial) April 19, 2026






