Israel Lebnon War : युद्धविराम नावापुरताच? इस्रायलचा लेबनॉनवर ताबा; बफर झोनसाठी लोकांच्या घराची तोडफोड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायलने याबाबत एक नवीन नकाशा जारी केला आहे. या नकाशानुसार, नवीन संरक्षण रेषेनुसार भूमध्य समुद्राचा किनारपट्टीपासून ते सीरियाच्या सीमेवरील माऊंट हरमोनपर्यंतचा भाग इस्रायलच्या ताब्यात आहे. या भागात लेबनॉनमधील अनेक महत्त्वाची गावे आणि टेकड्यांचा समावेश आहे. हा बफर झोन लितानी नदी ओलांडून पोहोचला आहे. याला इस्रायलने हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी फॉरवर्ड डिफेन्स लाईन म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu)यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी लेबनॉनमध्ये सुरक्षा कवच तयार करत असून तिथून माघार घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देखील सीमेजवळी इमारतींवर हिजबुल्लाहचे हल्ले होऊ शकतात यामुळे त्या सर्व इमारती जमिनदोस्त केल्या जाणार आहेत. दक्षिण लेबनॉनमध्येही अशी परिस्थिती आहे.
याच पार्श्वभूमीवर इस्रायलने पाच लष्करी तुकड्या आणि नौद लेबनॉनमध्ये तैनात केले आहे. बिंट जेबिल, खियामम आणि नकौरा या लेबनॉनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये इमारती पाडण्याचे काम या तुकड्यांना देण्यात आले आहे.
लेबनॉन(Lebanon)ने इस्रायलच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. याला युद्धविरामाचे उल्लंघन म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच लेबनॉनने युद्धविरामासाठी तयारी दर्शवली होती. हिजबुल्लाने देखील इस्रायलने सैन्य माघारी बोलावल्यास शस्त्रसंधीची हमी दर्शवली होती. मात्र इस्रायल हिजबुल्लाहला पूर्णत: नष्ट करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून कारवाई सुरुच ठेवली आहे.
🇱🇧🇮🇱 Israel Plans to Build 20 PERMANENT Military Bases in Southern Lebanon Israel’s Channel 12 is reporting that the Israeli army intends to establish 20 military sites in southern Lebanon, with operations set to continue even under a ceasefire. This is not a ceasefire, this is… https://t.co/JZVEHBoNPA pic.twitter.com/FqHck9R1tb — Ryan Rozbiani (@RyanRozbiani) April 20, 2026
Ans: इस्रायल हिजबुल्लाहला नष्ट करण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी लेबनॉनमध्ये बफर झोन तयार करत आहे.
Ans: युद्धविराम कागदावर असला तर इस्रायलच्या मते हिजबुल्लाह पूर्णरणे शस्त्रसंधीचे पालन करत नाही. यामुळे इस्रायलचा धोका अद्यापही टळलेला नाही असे नेतन्याहूंची म्हणणे आहे. यामुळे जोपर्यंत हिजबुल्लाह पूर्णपणे नष्ट होत वाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य माघारी घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.






